S M L

शेतातून 100 किलो कांदा चोरी !

13 जानेवारीकांद्याला आता सोन्याचा भावच नाहीतर सोन्याचा गुणही लागला असं म्हणण्याची वेळ आली. आणि त्याला कारणही तसेच आहे. कारण आता सोन्यासारखी कांद्याचीही चोरी होऊ लागली. नाशिकमधल्या वाकेगावातल्या अर्जून बच्छाव यांच्या शेतातून 100 किलो कांदा चोरीला गेला. पोलिस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हाही नोंदवण्यात आला. याप्रकरणी मनमाडच्या प्रमोद जाधवला पोलिसांनी ताब्यात घेतलंय तर त्याचे दोन साथीदार पळून गेलेत. त्यामुळे आता सोन्यासारखी कांद्याचीही काळजी घ्यावी लागणार आहे. हायवेलगतच्या शेतांना हा मोठा धोका झाला. एकीकडे महागाईनं ग्राहकांच्या डोळ्यातही पाणी आणि चोरांच्या भीतीनं शेतकर्‍यांच्याही मनात धास्ती अशीच काहीशी अवस्था झाली आहे..

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 13, 2011 12:05 PM IST

शेतातून 100 किलो कांदा चोरी !

13 जानेवारी

कांद्याला आता सोन्याचा भावच नाहीतर सोन्याचा गुणही लागला असं म्हणण्याची वेळ आली. आणि त्याला कारणही तसेच आहे. कारण आता सोन्यासारखी कांद्याचीही चोरी होऊ लागली. नाशिकमधल्या वाकेगावातल्या अर्जून बच्छाव यांच्या शेतातून 100 किलो कांदा चोरीला गेला. पोलिस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हाही नोंदवण्यात आला. याप्रकरणी मनमाडच्या प्रमोद जाधवला पोलिसांनी ताब्यात घेतलंय तर त्याचे दोन साथीदार पळून गेलेत. त्यामुळे आता सोन्यासारखी कांद्याचीही काळजी घ्यावी लागणार आहे. हायवेलगतच्या शेतांना हा मोठा धोका झाला. एकीकडे महागाईनं ग्राहकांच्या डोळ्यातही पाणी आणि चोरांच्या भीतीनं शेतकर्‍यांच्याही मनात धास्ती अशीच काहीशी अवस्था झाली आहे..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 13, 2011 12:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close