S M L

ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर यांच्यावर अंत्यसंस्कार

14 जानेवारीज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर यांच्यावर काही वेळापूर्वीच पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. काल त्यांचं पुण्यात निधन झालं होतं. ते 79 वर्षांचे होते. श्वसनाच्या आजाराने त्यांचं निधन झालं. त्यांच्या पश्चात पत्नी विजया, मुलगा गायक रघुनंदन पणशीकर आणि दोन मुली असा परिवार आहे. प्रभाकर पणशीकर यांचं पार्थिव आज अंत्यदर्शनासाठी पुण्यातल्या टिळक स्मारक मंदिराच्या प्रांगणात ठेवण्यात आलं होतं. नाटयरसिकांबरोबरच अनेक मान्यवर राजकारणींनीही त्याचं अंत्यदर्शन घेतलं. पणशीकरांच्या तो मी नव्हेच या नाटकानं नाट्यसृष्टीत इतिहास तयार केला. याशिवाय अश्रूंची झाली फुले, इथे ओशाळला मृत्यू, थँक यु मिस्टर ग्लॅड, भटाला दिली ओसरी, जिथे गवतास भाले फुटतात ही त्यांची नाटकं विशेष गाजली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 14, 2011 11:43 AM IST

ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर यांच्यावर अंत्यसंस्कार

14 जानेवारी

ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर यांच्यावर काही वेळापूर्वीच पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. काल त्यांचं पुण्यात निधन झालं होतं. ते 79 वर्षांचे होते. श्वसनाच्या आजाराने त्यांचं निधन झालं. त्यांच्या पश्चात पत्नी विजया, मुलगा गायक रघुनंदन पणशीकर आणि दोन मुली असा परिवार आहे. प्रभाकर पणशीकर यांचं पार्थिव आज अंत्यदर्शनासाठी पुण्यातल्या टिळक स्मारक मंदिराच्या प्रांगणात ठेवण्यात आलं होतं. नाटयरसिकांबरोबरच अनेक मान्यवर राजकारणींनीही त्याचं अंत्यदर्शन घेतलं. पणशीकरांच्या तो मी नव्हेच या नाटकानं नाट्यसृष्टीत इतिहास तयार केला. याशिवाय अश्रूंची झाली फुले, इथे ओशाळला मृत्यू, थँक यु मिस्टर ग्लॅड, भटाला दिली ओसरी, जिथे गवतास भाले फुटतात ही त्यांची नाटकं विशेष गाजली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 14, 2011 11:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close