S M L

अहमदाबादमध्ये 'कोडा'ला पसंती

15 जानेवारीपतंग उडवणं म्हणजे फक्त लहान मुलांचा खेळ आहे असं जर समजत असाल तर हा समज अहमदाबादकरांनी साफ खोटा ठरवला. मकरसंक्रांतीसाठी त्यांनी जय्यत तयारी केली. रायपूर दरवाजा भागातला बाजार रात्रीही सुरु असतो. पतंग, मांजा आणि फिरकी खरेदीसाठी मोठी गर्दी झाली. 20 रुपयांपासून ते 350 रुपयांपर्यंतचे वेगवेगळ्या व्हरायटीचे पतंग इथे मिळतात. पण लोकांची जास्त पसंती असते कोडा खरेदीला. कोडा म्हणजे 20 पतंगाचा एक सेट. या कोड्याची खासियत म्हणजे तुम्ही पसंत केलेला कोडा हा तुम्हाला उघडून पहाता येत नाही. जो कोडा मिळाला तो आपला. चांगला- वाईट ते तुमचं नशिब अशी पद्धत अहमदाबादमध्ये आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 15, 2011 08:15 AM IST

अहमदाबादमध्ये 'कोडा'ला पसंती

15 जानेवारी

पतंग उडवणं म्हणजे फक्त लहान मुलांचा खेळ आहे असं जर समजत असाल तर हा समज अहमदाबादकरांनी साफ खोटा ठरवला. मकरसंक्रांतीसाठी त्यांनी जय्यत तयारी केली. रायपूर दरवाजा भागातला बाजार रात्रीही सुरु असतो. पतंग, मांजा आणि फिरकी खरेदीसाठी मोठी गर्दी झाली. 20 रुपयांपासून ते 350 रुपयांपर्यंतचे वेगवेगळ्या व्हरायटीचे पतंग इथे मिळतात. पण लोकांची जास्त पसंती असते कोडा खरेदीला. कोडा म्हणजे 20 पतंगाचा एक सेट. या कोड्याची खासियत म्हणजे तुम्ही पसंत केलेला कोडा हा तुम्हाला उघडून पहाता येत नाही. जो कोडा मिळाला तो आपला. चांगला- वाईट ते तुमचं नशिब अशी पद्धत अहमदाबादमध्ये आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 15, 2011 08:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close