S M L

बिझनेस पेपर वाचताना

3 नोव्हेंबर, मुंबईबिझनेस स्टँडर्डनं त्यांची हेडलाईन बनवलीय ती भारतीय औद्योगिक कंपन्याच्या दुसर्‍या तिमाहीत घसरलेल्या नफ्याबाबत. मार्च 1998 पासून कंपन्यांचं नेट प्रॉफिट घसरत चालल्याचं या बातमीत म्हटलं आहे. यासाठी बिझनेस स्टॅण्डर्डनं 1,379 कंपन्यांचं परीक्षण केलं होतं त्यावरुन हा निष्कर्ष काढण्यात आला. त्यातही अनेक राज्यांमधल्या तेल कंपन्यांना अधिक तोटा होत असल्याचं या बातमीत म्हटलं आहे. इतर ऑटोमोबाईल, कुरिअर सर्व्हिसेस, मनोरंजन आणि घरगुती वापराच्या वस्तू बनवणार्‍या कंपन्यांचंही यात सर्वेक्षण क रण्यात आलं आहे.इकॉनॉमिक टाईम्सनी पहिल्याच पानावर तीन बातम्या हेडलाईनमध्ये दिल्या आहेत. आर्थिक संकटात सापडलेल्या म्युच्युअल फंड कंपन्यांनी आता खूप मोठ्या गुंतवणुकदारांनी सोडून जाऊ नये यासाठी त्यांना आधी करार केलेल्या युनिट्सच्या किमतींवर कधीही बाहेर पडता येईल, असा पर्याय दिला आहे. दुसरी बातमी आहे ती बँकिंग सेक्टरमधली. कमर्शियल बँका आता त्यांच्या दृष्टीनं क्रेडिट देण्यायोग्य नसणार्‍या कॉर्पोरेट कंपन्यांसाठी व्याजदर वाढवतील, असं या बातमीत म्हटलं आहे. लायन्स रिटेल आणि युकेमधली एक लॉजिस्टीक कंपनी विकँटन यांच्यामधला करार संपुष्टात येण्याची शक्यता आहे, हे सांगणार्‍या बातमीला देखील इकॉनामिक टाईम्समध्ये पहिल्या पानावर जागा मिळाली आहे.मिंटनंही थोड्याफार प्रमाणात बिझनेस स्टँडर्डसारखीच बातमी दिली आहे. कंपन्याच्या कमी झालेल्या महसूलाबाबत यात टिपण्णी करण्यात आली आहे. मिंटनं त्यांच्या बातमीत बीएसई आणि एनएसईमध्ये नोंदणीकृत असणार्‍या कंपन्यांचा आढावा घेतला आहे. जसजसे सेन्सेक्स आणि निफ्टी ढासळले त्याचप्रमाणे या कंपन्याची कामगिरीही खालावली, असं या बातमीत म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 3, 2008 06:33 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 3, 2008 06:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close