S M L

चारित्र्याच्या संशयावरुन माजी सैनिकानं पत्नीचं नाक कापलं !

16 जानेवारीबीड जिल्ह्यातील एका माजी सैनिकानं अक्षरशः कौर्याची सीमाच गाठली. कुणी शत्रूशीही असं वर्तन करणार नाही असं कौर्य त्यानं स्वतःच्या पत्नीशी केलं. चारित्र्याच्या संशयावरुन त्यानं पत्नीला अमानूषपणे मारहाण करत तिचे कान आणि नाक कापलंय. एवढ्यावरच न थांबता तिच्या पायाची बोटेही कापण्याचा प्रयत्न त्यानं केला. हृदय हेलावून टाकणार्‍या या घटनेनं पत्नी छाया यांच्यासह त्यांचे नातेवाईकही हवालदिल झालेत. पाटोदा तालुक्यातील डोमरी या गावातील कल्याण भोंडवे निवृत्त लष्करी सैनिक आहे. तर त्याची पत्नी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. पंचवीस वर्षापूर्वी विवाह झालेल्या या दांपत्याला दोन मुलंही आहेत. मात्र चारित्र्याच्या संशयाने झपाटलेला कल्याण गेल्या कित्येक वर्षांपासून पत्नीचा अनन्वित छळ करत होता. मात्र नऊ जानेवारीला कल्याणच्या क्रौर्यानं परिसीमा गाठली. पत्नीला शेतात नेऊन तिचे हातपाय बांधून कल्याणनं कात्रीने तिच्या कानाच्या पाळ्या आणि नाकाचा शेंडा कापून टाकला. शिवाय तीच्या पायाची बोटही त्यानं कापून टाकण्याचा प्रयत्न केला. या महिलेचा एक पायही या घटनेत फ्रॅक्चर झाला आहे. या घटनेनंतर पीडित महिलेनं पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 16, 2011 01:34 PM IST

चारित्र्याच्या संशयावरुन माजी सैनिकानं पत्नीचं नाक कापलं !

16 जानेवारी

बीड जिल्ह्यातील एका माजी सैनिकानं अक्षरशः कौर्याची सीमाच गाठली. कुणी शत्रूशीही असं वर्तन करणार नाही असं कौर्य त्यानं स्वतःच्या पत्नीशी केलं. चारित्र्याच्या संशयावरुन त्यानं पत्नीला अमानूषपणे मारहाण करत तिचे कान आणि नाक कापलंय. एवढ्यावरच न थांबता तिच्या पायाची बोटेही कापण्याचा प्रयत्न त्यानं केला. हृदय हेलावून टाकणार्‍या या घटनेनं पत्नी छाया यांच्यासह त्यांचे नातेवाईकही हवालदिल झालेत. पाटोदा तालुक्यातील डोमरी या गावातील कल्याण भोंडवे निवृत्त लष्करी सैनिक आहे. तर त्याची पत्नी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. पंचवीस वर्षापूर्वी विवाह झालेल्या या दांपत्याला दोन मुलंही आहेत. मात्र चारित्र्याच्या संशयाने झपाटलेला कल्याण गेल्या कित्येक वर्षांपासून पत्नीचा अनन्वित छळ करत होता. मात्र नऊ जानेवारीला कल्याणच्या क्रौर्यानं परिसीमा गाठली. पत्नीला शेतात नेऊन तिचे हातपाय बांधून कल्याणनं कात्रीने तिच्या कानाच्या पाळ्या आणि नाकाचा शेंडा कापून टाकला. शिवाय तीच्या पायाची बोटही त्यानं कापून टाकण्याचा प्रयत्न केला. या महिलेचा एक पायही या घटनेत फ्रॅक्चर झाला आहे. या घटनेनंतर पीडित महिलेनं पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 16, 2011 01:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close