S M L

मुंबई मॅरेथॉनमध्ये सावळा गोंधळ ; चुकीचा विजेता घोषित

17 जानेवारीमुंबई मॅरेथॉन आयोजनातला एक अभूतपूर्व गोंधळ काल बघायला मिळाला. भारतीय विभागात रेस पूर्णही न केलेल्या ऍथलीट खेळाडूना विजयी घोषित करण्याचा प्रकार घडला. महिलांमध्ये वहीदा खान आणि विद्या मेहता यांना सुरुवातीला विजयी घोषित करण्यात आलं. त्यांचा बक्षीस समारंभही पार पडला. पण त्यांच्या मागाहून आलेल्या ज्योती गवाते आणि शास्त्री देवी यांना हा निकाल पटला नाही. आणि त्यांनी रेस डिरेक्टर यांच्याकडे दाद मागितली. त्यानंतर पुढचे दोन - अडीच तास नुसता गोंधळाचा गेला. आणि खरा प्रकार उघड झाला. वहिदा खान आणि विद्या मेहता वाटेत रस्ता चुकल्या होत्या. आणि चुकून हाफ मॅरेथॉनच्या मार्गाने धावल्या. त्यामुळे शर्यत त्यांनी लवकर पूर्ण केली. वहीदाने यापूर्वी कधीही 42 किलोमीटरचं अंतर तीन तासांच्या आत पूर्ण केलं नव्हतं. पण काल तिची वेळ होती चक्क 2 तास 46 मिनिटांची. तिसर्‍या आलेल्या शास्त्री देवीला वेळेवरुन शंका आली. आणि तिने शाहनिशा केल्यावर झाला प्रकार लक्षात आला. अखेर वहीदा आणि विद्या यांना डिसक्वालिफाय करण्यात आलं. आणि परभणीच्या ज्योती गवातेला विजयी घोषित करण्यात आलं. तिने तीन तास पाच मिनिटं आणि तीस सेकंदांची वेळ दिली. तर शास्त्री देवी दुसरी आली. वहीदाला डिसक्वालिफाय केलं असलं तरी ती वाट का चुकली. तिच्या चुकीमुळे की स्वयंसेवक आणि पर्यायाने आयोजकांनी मार्ग दाखवण्यात चूक केल्यामुळे हा ही प्रश्न यामुळे उभा राहिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 17, 2011 11:36 AM IST

मुंबई मॅरेथॉनमध्ये सावळा गोंधळ ; चुकीचा विजेता घोषित

17 जानेवारी

मुंबई मॅरेथॉन आयोजनातला एक अभूतपूर्व गोंधळ काल बघायला मिळाला. भारतीय विभागात रेस पूर्णही न केलेल्या ऍथलीट खेळाडूना विजयी घोषित करण्याचा प्रकार घडला. महिलांमध्ये वहीदा खान आणि विद्या मेहता यांना सुरुवातीला विजयी घोषित करण्यात आलं. त्यांचा बक्षीस समारंभही पार पडला. पण त्यांच्या मागाहून आलेल्या ज्योती गवाते आणि शास्त्री देवी यांना हा निकाल पटला नाही. आणि त्यांनी रेस डिरेक्टर यांच्याकडे दाद मागितली. त्यानंतर पुढचे दोन - अडीच तास नुसता गोंधळाचा गेला. आणि खरा प्रकार उघड झाला. वहिदा खान आणि विद्या मेहता वाटेत रस्ता चुकल्या होत्या. आणि चुकून हाफ मॅरेथॉनच्या मार्गाने धावल्या. त्यामुळे शर्यत त्यांनी लवकर पूर्ण केली. वहीदाने यापूर्वी कधीही 42 किलोमीटरचं अंतर तीन तासांच्या आत पूर्ण केलं नव्हतं. पण काल तिची वेळ होती चक्क 2 तास 46 मिनिटांची. तिसर्‍या आलेल्या शास्त्री देवीला वेळेवरुन शंका आली. आणि तिने शाहनिशा केल्यावर झाला प्रकार लक्षात आला. अखेर वहीदा आणि विद्या यांना डिसक्वालिफाय करण्यात आलं. आणि परभणीच्या ज्योती गवातेला विजयी घोषित करण्यात आलं. तिने तीन तास पाच मिनिटं आणि तीस सेकंदांची वेळ दिली. तर शास्त्री देवी दुसरी आली. वहीदाला डिसक्वालिफाय केलं असलं तरी ती वाट का चुकली. तिच्या चुकीमुळे की स्वयंसेवक आणि पर्यायाने आयोजकांनी मार्ग दाखवण्यात चूक केल्यामुळे हा ही प्रश्न यामुळे उभा राहिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 17, 2011 11:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close