S M L

नाटककार महेश एलकुंचवार यांना जनस्थान पुरस्कार जाहीर

17 जानेवारीभारतीय रंगभूमीवर आपल्या वैशिष्टयपूर्ण नाटकांचा ठसा उमटवणारे प्रयोगशील नाटककार महेश एलकुंचवार यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा जनस्थान पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतीय रंगभूमीला वेगळं वळण देणा-या 15 पेक्षा जास्त नाटकांचं लेखन त्यांनी केलं आहे. त्यांची सर्वच नाटकं आशयघन आणि वेगळा विचार देणारी आहेत. त्यांच्या नाटकांचा त्रिनाट्यधारा हा प्रयोग, सुलतान, होली, पार्टी, रक्तपुष्प, आत्मकथा अशा अनेक नाटकांतून एलकुंचवार यांनी सामाजिक भाष्य केलं. त्यांच्या होली नाटकावर केतन मेहतानं त्याच नावानं सिनेमाही बनवला. त्यांच्या नाटकांची इंग्लिश, जर्मन, फ्रेंच भाषांमध्ये भाषांतरंही झाली. संगीत अकादमी ऍवॉर्ड, साहित्य अकादमी ऍवॉर्ड अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 17, 2011 12:05 PM IST

नाटककार महेश एलकुंचवार यांना जनस्थान पुरस्कार जाहीर

17 जानेवारी

भारतीय रंगभूमीवर आपल्या वैशिष्टयपूर्ण नाटकांचा ठसा उमटवणारे प्रयोगशील नाटककार महेश एलकुंचवार यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा जनस्थान पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतीय रंगभूमीला वेगळं वळण देणा-या 15 पेक्षा जास्त नाटकांचं लेखन त्यांनी केलं आहे. त्यांची सर्वच नाटकं आशयघन आणि वेगळा विचार देणारी आहेत. त्यांच्या नाटकांचा त्रिनाट्यधारा हा प्रयोग, सुलतान, होली, पार्टी, रक्तपुष्प, आत्मकथा अशा अनेक नाटकांतून एलकुंचवार यांनी सामाजिक भाष्य केलं. त्यांच्या होली नाटकावर केतन मेहतानं त्याच नावानं सिनेमाही बनवला. त्यांच्या नाटकांची इंग्लिश, जर्मन, फ्रेंच भाषांमध्ये भाषांतरंही झाली. संगीत अकादमी ऍवॉर्ड, साहित्य अकादमी ऍवॉर्ड अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 17, 2011 12:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close