S M L

'लवासा'वर कारवाई होणार ?

17 जानेवारीलवासा प्रकल्प संदर्भातला अहवाल पर्यावरण मंत्रालय उद्या मुंबई हायकोर्टात सादर करणार आहे. आयबीएन नेटवर्कला मिळालेल्या माहितीनुसार पर्यावरण कायद्याचं उल्लंघन झाल्याची नोंद या अहवालात करण्यात आली. त्यामुळे लवासाला तुर्तास दिलासा मिळण्याची शक्यता नाही. पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून लवासाचं काम झाल्याचा आरोप करण्यात येत आहेत. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड आणि डोंगर तोडण्यात आल्याने नागरीक आणि सामाजिक कार्यकर्त्याचा या प्रकल्पाला विरोध आहे. त्यामुळे लवासा प्रकल्प वादात सापडला. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय पर्यावरण विभागाच्या तीन सदस्यीय पथकानं लवासाची पाहणी केली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 17, 2011 04:26 PM IST

'लवासा'वर कारवाई होणार  ?

17 जानेवारी

लवासा प्रकल्प संदर्भातला अहवाल पर्यावरण मंत्रालय उद्या मुंबई हायकोर्टात सादर करणार आहे. आयबीएन नेटवर्कला मिळालेल्या माहितीनुसार पर्यावरण कायद्याचं उल्लंघन झाल्याची नोंद या अहवालात करण्यात आली. त्यामुळे लवासाला तुर्तास दिलासा मिळण्याची शक्यता नाही. पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून लवासाचं काम झाल्याचा आरोप करण्यात येत आहेत. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड आणि डोंगर तोडण्यात आल्याने नागरीक आणि सामाजिक कार्यकर्त्याचा या प्रकल्पाला विरोध आहे. त्यामुळे लवासा प्रकल्प वादात सापडला. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय पर्यावरण विभागाच्या तीन सदस्यीय पथकानं लवासाची पाहणी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 17, 2011 04:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close