S M L

लवासा प्रकरणी पुढची सुनावणी 27 जानेवारीला

18 जानेवारीलवासा प्रकरणावरची पुढची सुनावणी 27 जानेवारीला होणार आहे. लवासाबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्रालय आज प्रतिज्ञापत्र आणि अहवाल हायकोर्टाच्या रजिस्टारकडे सादर करणार आहे. मात्र या रिपोर्टवर 27 जानेवारीला सुनावणी होणार असल्याचं कोर्टानं स्पष्ट केलं. आयबीएन नेटवर्कला मिळालेल्या माहितीनुसार पर्यावरण कायद्याचं उल्लघन झाल्याची नोंद या अहवालात करण्यात आली आहे. त्यामुळे लवासाला तुर्तास दिलासा मिळण्याची शक्यता नाही. पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून लवासाचे काम झाल्याचा आरोप करण्यात येत आहेत. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड आणि डोंगर तोडण्यात आल्याने सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेत. त्यामुळे लवासा प्रकल्प वादात सापडला. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय पर्यावरण विभागाच्या तीन सदस्यांच्या टीमनं लवासाची पाहणी केली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 18, 2011 09:41 AM IST

लवासा प्रकरणी पुढची सुनावणी 27 जानेवारीला

18 जानेवारी

लवासा प्रकरणावरची पुढची सुनावणी 27 जानेवारीला होणार आहे. लवासाबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्रालय आज प्रतिज्ञापत्र आणि अहवाल हायकोर्टाच्या रजिस्टारकडे सादर करणार आहे. मात्र या रिपोर्टवर 27 जानेवारीला सुनावणी होणार असल्याचं कोर्टानं स्पष्ट केलं. आयबीएन नेटवर्कला मिळालेल्या माहितीनुसार पर्यावरण कायद्याचं उल्लघन झाल्याची नोंद या अहवालात करण्यात आली आहे. त्यामुळे लवासाला तुर्तास दिलासा मिळण्याची शक्यता नाही. पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून लवासाचे काम झाल्याचा आरोप करण्यात येत आहेत. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड आणि डोंगर तोडण्यात आल्याने सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेत. त्यामुळे लवासा प्रकल्प वादात सापडला. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय पर्यावरण विभागाच्या तीन सदस्यांच्या टीमनं लवासाची पाहणी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 18, 2011 09:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close