S M L

केंद्रीय मंत्रिमंडळात तीन नव्या जागा निश्चित

18 जानेवारीकेंद्रीय मंत्रिमंडळात आज फेरबदल होणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर हे फेरबदल होणार आहे. याच संदर्भात पंतप्रधानांनी आज सोनिया गांधीची भेट घेतली. मंत्रिमंडळ फेरबदलासंदर्भात चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते. या बैठकीला अहमद पटेलही उपस्थित होते. यावेळी मंत्रिमंडळात तीन केंद्रीय मंत्र्यांंच्या जागी नव्या नियुक्त्त्या होणार आहे. तर दोन मंत्र्यांची खाती कमी होणार आहे. काही तरुण चेहरे मंत्रिमंडळात दिसण्याची शक्यता आहे. कपिल सिब्बल यांच्याकडे दूरसंचार खात्याचा कार्यभार कायम ठेवला जाईल. आणि त्यांचं केंद्रीय मनुष्यबळ विकास खातं दुसर्‍या कुणाकडे तरी दिलंं जाईल अशी शक्यता आहे. ज्योतिरादित्य सिंदिया यांच्याकडे परराष्ट्र राज्यमंत्रिपद दिलं जाऊ शकतं. तसेच कृषीमंत्री शरद पवार यांच्या खात्यांमध्येही बदल होणार आहेत. तर दुसरीकडे याच महिन्यात काँग्रेस कार्यकारीणीतही काही बदल होण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 18, 2011 12:18 PM IST

केंद्रीय मंत्रिमंडळात तीन नव्या जागा निश्चित

18 जानेवारी

केंद्रीय मंत्रिमंडळात आज फेरबदल होणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर हे फेरबदल होणार आहे. याच संदर्भात पंतप्रधानांनी आज सोनिया गांधीची भेट घेतली. मंत्रिमंडळ फेरबदलासंदर्भात चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते. या बैठकीला अहमद पटेलही उपस्थित होते. यावेळी मंत्रिमंडळात तीन केंद्रीय मंत्र्यांंच्या जागी नव्या नियुक्त्त्या होणार आहे. तर दोन मंत्र्यांची खाती कमी होणार आहे. काही तरुण चेहरे मंत्रिमंडळात दिसण्याची शक्यता आहे. कपिल सिब्बल यांच्याकडे दूरसंचार खात्याचा कार्यभार कायम ठेवला जाईल. आणि त्यांचं केंद्रीय मनुष्यबळ विकास खातं दुसर्‍या कुणाकडे तरी दिलंं जाईल अशी शक्यता आहे. ज्योतिरादित्य सिंदिया यांच्याकडे परराष्ट्र राज्यमंत्रिपद दिलं जाऊ शकतं. तसेच कृषीमंत्री शरद पवार यांच्या खात्यांमध्येही बदल होणार आहेत. तर दुसरीकडे याच महिन्यात काँग्रेस कार्यकारीणीतही काही बदल होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 18, 2011 12:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close