S M L

नाशिकमध्ये कमान दुर्घटना प्रकरणी दोन अधिकारी निलंबित

18 जानेवारीनाशिक महापालिका कमान दुर्घटना प्रकरणी महापालिकेनं मोहम्मद कौस आणि सुनिल रौंदळ 2 इंजिनिअर्सना निलंबित केलं. ठेकेदारासह महापालिकेच्या या दोन्ही इंजिनिअर्सवर सदोष मनुष्यवध आणि निष्काळजीपणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विहीतगावमधल्या सौभाग्यनगरमध्ये सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. बांधकाम सुरू असलेली ही कमान कोसळल्यानं खालून जाणार्‍या रिक्षाचा चक्काचूर झाला. महापालिकेच्या निकृष्ट बांधकामामुळे ही कमान पडल्याची तक्रार पुढे येते. मृतांमध्ये अनिल ननावरे या 7 वर्षांच्या मुलाचा आणि रिक्षा ड्रायव्हर शैलेश पगारेचा समावेश आहे. दगावलेल्या महिलेची ओळख पटू शकलेली नाही. याआधी चार वर्षापूर्वी सातपूरमध्ये स्वागतकमानीची घंटा पडून एक नागरीक ठार झाला होता. तेव्हापासून कमानीच्या निकृष्ट बांधकामासंदर्भात अनेक तक्रारी होत्या.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 18, 2011 01:00 PM IST

नाशिकमध्ये कमान दुर्घटना प्रकरणी दोन अधिकारी निलंबित

18 जानेवारी

नाशिक महापालिका कमान दुर्घटना प्रकरणी महापालिकेनं मोहम्मद कौस आणि सुनिल रौंदळ 2 इंजिनिअर्सना निलंबित केलं. ठेकेदारासह महापालिकेच्या या दोन्ही इंजिनिअर्सवर सदोष मनुष्यवध आणि निष्काळजीपणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विहीतगावमधल्या सौभाग्यनगरमध्ये सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. बांधकाम सुरू असलेली ही कमान कोसळल्यानं खालून जाणार्‍या रिक्षाचा चक्काचूर झाला. महापालिकेच्या निकृष्ट बांधकामामुळे ही कमान पडल्याची तक्रार पुढे येते. मृतांमध्ये अनिल ननावरे या 7 वर्षांच्या मुलाचा आणि रिक्षा ड्रायव्हर शैलेश पगारेचा समावेश आहे. दगावलेल्या महिलेची ओळख पटू शकलेली नाही. याआधी चार वर्षापूर्वी सातपूरमध्ये स्वागतकमानीची घंटा पडून एक नागरीक ठार झाला होता. तेव्हापासून कमानीच्या निकृष्ट बांधकामासंदर्भात अनेक तक्रारी होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 18, 2011 01:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close