S M L

लवासात विनापरवाना वॉटर पार्क ; जिल्हा प्रशासनाची नोटीस

18 जानेवारीलवासा कॉर्पोरेशनला आणखी एक दणका मिळाला. विनापरवाना वॉटर स्पोर्ट्स अम्युझमेंट पार्क सुरु केल्याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने नोटीस पाठवली आहे. मुंबई करमणुक कायदा 1923 कलम 4 (2 ब) अन्वये परवानगी घेतल्याच दिसून आलेलं नाही. वॉटर स्पोर्टसाठी घेण्यात येणारी तिकिट विक्री ही करमणुक कर निरिक्षक यांच्या मंजुरी शिवाय सुरु असल्यामुळे शासनाचा मोठा महसुल बुडत असल्याचं नोटीसमध्ये सांगण्यात आलं आहे. आपल्याकडून करमणुक कर आणि दंड यांची वसुली का करण्यात येऊ नये अशी विचारणा जिल्हाधिकारी कार्यालयाने केली आहे. 10 सप्टेंबर 2010 ही नोटीस जिल्हाधिकार्‍यांनी पाठवली. पण लवासाने आपल्याला राज्यसरकारने 10 वर्ष करमणुक कर माफी दिली असल्याने लवासाला करमणुक कर लागु नसल्याचं उत्तर दिलं. जिल्हाधिकारी कार्यालयाने लवासाचे युक्तीवाद फेटाळला. करमणुक कर निरिक्षकांना 15 दिवसाच्या आत अहवाल द्यायला सांगितल आहे. लवासात वॉटर स्पोर्ट्स अम्युझमेंट पार्क 2008 पासून सुरु आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 18, 2011 01:22 PM IST

लवासात विनापरवाना वॉटर पार्क ; जिल्हा प्रशासनाची नोटीस

18 जानेवारी

लवासा कॉर्पोरेशनला आणखी एक दणका मिळाला. विनापरवाना वॉटर स्पोर्ट्स अम्युझमेंट पार्क सुरु केल्याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने नोटीस पाठवली आहे. मुंबई करमणुक कायदा 1923 कलम 4 (2 ब) अन्वये परवानगी घेतल्याच दिसून आलेलं नाही. वॉटर स्पोर्टसाठी घेण्यात येणारी तिकिट विक्री ही करमणुक कर निरिक्षक यांच्या मंजुरी शिवाय सुरु असल्यामुळे शासनाचा मोठा महसुल बुडत असल्याचं नोटीसमध्ये सांगण्यात आलं आहे. आपल्याकडून करमणुक कर आणि दंड यांची वसुली का करण्यात येऊ नये अशी विचारणा जिल्हाधिकारी कार्यालयाने केली आहे. 10 सप्टेंबर 2010 ही नोटीस जिल्हाधिकार्‍यांनी पाठवली. पण लवासाने आपल्याला राज्यसरकारने 10 वर्ष करमणुक कर माफी दिली असल्याने लवासाला करमणुक कर लागु नसल्याचं उत्तर दिलं. जिल्हाधिकारी कार्यालयाने लवासाचे युक्तीवाद फेटाळला. करमणुक कर निरिक्षकांना 15 दिवसाच्या आत अहवाल द्यायला सांगितल आहे. लवासात वॉटर स्पोर्ट्स अम्युझमेंट पार्क 2008 पासून सुरु आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 18, 2011 01:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close