S M L

जळगावमध्ये ट्रक नाल्यात कलंडला 5 जणांचा मृत्यू

18 जानेवारीजळगावच्या मुक्ताईनगर नगर इथं कर्कीच्या आरटीओ चेकपोस्टजवळ झालेल्या भीषण अपघातात 5 जणांना बळी गेला. चेकपोस्टवर पावती फाडायला ड्रायव्हर गेला आणि अचानक न्यूट्रल झालेला हा ट्रक रस्त्यालगत असलेल्या नाल्यात जाऊन कलंडला.गाडीत लोड केलेल्या संगमरवरच्या फरश्यांच्या खाली गाडीतले प्रवासी दबले. कोणतीच मदत मिळण्यासारखी परिस्थिती नसल्यानं क्लीनरसह 5 जणांना आपला जीव गमवावा लागला. चेकपोस्टवर जाताना ड्रायव्हरनं ट्रक गिअरमधे टाकला असता तर हा अनर्थ घडला नसता.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 18, 2011 03:31 PM IST

जळगावमध्ये ट्रक नाल्यात कलंडला 5 जणांचा मृत्यू

18 जानेवारी

जळगावच्या मुक्ताईनगर नगर इथं कर्कीच्या आरटीओ चेकपोस्टजवळ झालेल्या भीषण अपघातात 5 जणांना बळी गेला. चेकपोस्टवर पावती फाडायला ड्रायव्हर गेला आणि अचानक न्यूट्रल झालेला हा ट्रक रस्त्यालगत असलेल्या नाल्यात जाऊन कलंडला.गाडीत लोड केलेल्या संगमरवरच्या फरश्यांच्या खाली गाडीतले प्रवासी दबले. कोणतीच मदत मिळण्यासारखी परिस्थिती नसल्यानं क्लीनरसह 5 जणांना आपला जीव गमवावा लागला. चेकपोस्टवर जाताना ड्रायव्हरनं ट्रक गिअरमधे टाकला असता तर हा अनर्थ घडला नसता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 18, 2011 03:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close