S M L

नवी मुंबईत एपीएमसीच्या निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का

3 नोव्हेंबर, मुंबईनवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजेच एपीएमसीच्या संचालकपदाच्या 17 जागांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झालेत. पहिल्या टप्प्यात जाहीर झालेल्या 6 जागांचे निकाल पाहता या निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का बसल्याचं चित्र आहे तरीही राष्ट्रवादी काँग्रेसनं या निवडणुकीत वर्चस्व राखल्याचं दिसतंय. वाशी इथे असलेल्या अन्नधान्य, कांदा-बटाटा, मसाला, भाजी आणि फळं अशा पाच बाजारपेठांच्या विविध समित्यांच्या संचालक पदासाठी मतदान झालं होतं. गेली काही वर्ष या समितीवर अशोक गावडे, बाळासाहेब बेंडे आणि मोहन गुरनानी या बड्या नावांचं वर्चस्व होतं. पण त्यांना या निवडणुकीत व्यापारी मतदारसंघातून पराभव पत्कारावा लागला. शशिकांत शिंदे यांना कामगार मतदारसंघातून विजय मिळवलाय. बोगस मतदार नोंदणी, स्टॉल्सचं वितरण आणि भाजीपाला एपीएमसीत न आणता थेट मुंबईत पाठवणं, या तीन कारणांमुळे मोठी नाराजी होती. हीच नाराजी आणखी अनेक प्रस्थापितांना भोवणार, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 3, 2008 10:40 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 3, 2008 10:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close