S M L

अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीची इंटरनेटवरही धूम

3 नोव्हेंबर, अमेरिकाअमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीला फक्त एकच दिवस उरलाय. बराक ओबामा ही निवडणूक सहज जिंकतील असंच आतापर्यंतचं चित्र आहे. पण यू ट्युबर मात्र ओबामा आणि मॅक्केन या दोन उमेदवारांच्या लोकप्रियतेचं वेगळंच चित्र पाहायला मिळतंय. अमेरिकेच्या अध्यक्षपदाची यावेळचीनिवडणूक आतापर्यंतच्या निवडणुकींपेक्षा वेगळी आहे. मोठ्या कल्पक पध्दतीनं इंटरनेटवर या निवडणुकीचा प्रचार कण्यात येत आहे. वेगवेगळ्या व्हिडियोजमधून आपण ही कल्पकता पाहू शकतो. उदाहरणंच घ्यायचं झालं तर, एका व्हिडियोमध्ये सिनेटर मॅक्केन डान्स करतायत. इतकंच नव्हे तर ते नव्या सेलिब्रेटिशी रोमान्सही करताना दिसतात. या प्रकारात मॅक्केन यांचे प्रतिस्पर्धी ओबामासुद्धा मागे नाहीत. ' ओबामा डान्स ' हा त्यांचा व्हिडियो बराच लोकप्रिय आहे. आतापर्यंत ज्यांनी कुणाला मतदान करायचं याचा निर्णय घेतला नाही. त्यांनी मॅक्केन आणि ओबामा यांचा हा डान्स पाहून आपला निर्णय घ्यायला हरकत नाही.ओबामा आणि मॅक्केन यांचे समर्थकही यात सामील आहेत. ओबामाच्या प्रचाराला आहे ' हॉट ओबामा गर्ल ' तर दुसरीकडं आहे ' मॅक्केन गर्ल.' मॅक्केन यांच्या प्रचारासाठी ती शो करत आहे. या प्रचारात हॉकी मॉमसुद्धा अध्यक्षपदाच्या रिंगणात आहे. ती अध्यक्ष होण्याचे स्वप्न पाहत आहे. ओबामा आणि मक्केन यांच्या प्रचारासाठी वेगवेगळे इंटरनेट गेम्सही आपण नेटवर पाहू शकतो.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 3, 2008 12:04 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 3, 2008 12:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close