S M L

जेजुरीत गाढव बाजाराला सुरुवात

19 जानेवारीदरवर्षीप्रमाणे पौष महिन्यातील पौर्णिमेला जेजुरीला गाढवांचा बाजार भरतो. यंदाही राज्याच्या कानाकोपर्‍यातून वैदू, कैकाडी, मांग, पाथरवट अशी अठरापगड जातीचे लोक गाढवांच्या खरेदी-विक्री करता जमले होते. 4 हजारापासून 20 हजारापर्यंतच्या दरानं गाढवं विकली गेली. यंदाही गुजरातच्या काठेवाडी गाढवांना मोठी मागणी होती. एरवी कस्पटासमान लेखल्या जाणार्‍या गाढवांना या बाजारात चांगली किंमत मिळते. गाढव विकत घेतल्यावर काहीजण वाजतगाजत हलगी ताशाच्या गाजावाज्यात गाढवांची मिरवणूक काढतात. इथं काळ्या पांढर्‍या लहान गाढवांपासून ते उंच्यापुर्‍या दणकट काठेवाडी गाढवांपर्यंत शेकडो गाढवांची जत्रा भरते.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 19, 2011 03:58 PM IST

जेजुरीत गाढव बाजाराला सुरुवात

19 जानेवारी

दरवर्षीप्रमाणे पौष महिन्यातील पौर्णिमेला जेजुरीला गाढवांचा बाजार भरतो. यंदाही राज्याच्या कानाकोपर्‍यातून वैदू, कैकाडी, मांग, पाथरवट अशी अठरापगड जातीचे लोक गाढवांच्या खरेदी-विक्री करता जमले होते. 4 हजारापासून 20 हजारापर्यंतच्या दरानं गाढवं विकली गेली. यंदाही गुजरातच्या काठेवाडी गाढवांना मोठी मागणी होती. एरवी कस्पटासमान लेखल्या जाणार्‍या गाढवांना या बाजारात चांगली किंमत मिळते. गाढव विकत घेतल्यावर काहीजण वाजतगाजत हलगी ताशाच्या गाजावाज्यात गाढवांची मिरवणूक काढतात. इथं काळ्या पांढर्‍या लहान गाढवांपासून ते उंच्यापुर्‍या दणकट काठेवाडी गाढवांपर्यंत शेकडो गाढवांची जत्रा भरते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 19, 2011 03:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close