S M L

मुंबईत बँकेचं लॉकर्स फोडणार्‍या 4 जणांना अटक

19 जानेवारीमुंबईत ऑपेरा हाऊसमध्ये बँक ऑफ इंडियाच्या लॉकर्समध्ये 4 कोटी 40 लाख रुपयांची चोरी झाल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली. या चौघांनी डुप्लिकेट चाव्यांच्या सहाय्याने लॉकर उघडून ही चोरी केली. गेल्या तीन वर्षात या टोळीनं 14 लॉकर्स फोडले आहेत. शमसुद्दीन आझमी, अजय मेहता, चंद्रसेन बेर्डे अशी या आरोपींची नाव आहेत. लॉकर्सवर डल्ला मारणारी एक वेगळीच गँग कार्यरत असल्याचे पोलिस तपासात उघडकीला आलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 19, 2011 05:14 PM IST

मुंबईत बँकेचं लॉकर्स फोडणार्‍या 4 जणांना अटक

19 जानेवारी

मुंबईत ऑपेरा हाऊसमध्ये बँक ऑफ इंडियाच्या लॉकर्समध्ये 4 कोटी 40 लाख रुपयांची चोरी झाल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली. या चौघांनी डुप्लिकेट चाव्यांच्या सहाय्याने लॉकर उघडून ही चोरी केली. गेल्या तीन वर्षात या टोळीनं 14 लॉकर्स फोडले आहेत. शमसुद्दीन आझमी, अजय मेहता, चंद्रसेन बेर्डे अशी या आरोपींची नाव आहेत. लॉकर्सवर डल्ला मारणारी एक वेगळीच गँग कार्यरत असल्याचे पोलिस तपासात उघडकीला आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 19, 2011 05:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close