S M L

' अमेरिकेची प्रतिमा ओबामा बदलणार '

3 नोव्हेंबर, मुंबईअमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक दिवसेंदिवस जवळ येत आहे आणि या निवडणुकीत अर्थातच या निवडणुकीत ' हॉट फेव्हरीट ' आहेत बराक ओबामा. त्यांच्या बर्‍याच विषयांवरील भूमिका जॉर्ज बुश यांच्यापेक्षा सर्वस्वी भिन्नं आहेत. बराक ओबामांचा अजेंडा आणि त्यांच्या वेगवेगळ्या विषयातल्या भूमिका, यासंदर्भात आयबीन लोकमतच्या फिचर्स एडिटर ज्ञानदा देशपांडे यांनी मुंबई विद्यापिठाच्या आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या प्रध्यापिका उत्तरा सहस्त्रबुद्धे यांच्याशी चर्चा केली.अमेरिकेतील अनेक भारतीय एनआरआय आज ओबांमांना समर्थन देत आहेत. भारतातील कित्येक तरुणांमध्येही ओबामांची लोकप्रियता सतत वाढताना दिसत आहे. भारतीयांना ओबांमांचं एवढ आकर्षण का वाटतंय ?अमेरिकेच्या अध्यक्षपदाची संधी वंछित समाजाच्या प्रतिनिधीला प्रथमच मिळत आहे. ओबांमांच्या कार्यकमपत्रिकेवरचे विषय जसे त्यांच्या लोकप्रियतेला कारणीभूत आहेत, तसंच एक अफ्रिकन-अमेरिकन वंशाची व्यक्ती अमेरिकन अध्यक्षपदासाठी उभी रहाते , याचं आकर्षणही आहे. गेल्या आठ वर्षात अमेरिकेची जी प्रतिमा निर्माण झालीय, ती ओबामा बदलू शकतात, असा विश्वास अमेरिकेतल्या भारतीयांना वाटत आहे.गेल्या आठ वर्षातलं बुश यांचं राजकारण अमेरिकाकेंद्रीत होतं. अमेरिका म्हणजे जणू ' अंकल सॅम ' असून तो जगावर राज्य करायला निघाला आहे, अशी अमेरिकेची प्रतिमा त्यांनी तयार केली होती. ही प्रतिमा बदलण्याची ताकद ओबामांकडे आहे, या भावनेने अमेरिकेत ओबांमांना पाठिंबा मिळतोय का ?नक्कीच. इराकबाबत किंवा अगदी अंतर्गत सुरक्षेबाबत त्यांनी जी मतं मांडली, ती लोकांसठी सर्वस्वी नवीन होती. प्रचारादरम्यान ओबांमांनी मांडलेल्या अनेक भूमिकांचं लिबरल अमेरिकी माणसानं स्वागत केलं आहे. बुश यांच्या धोरणांमधून ओबामा अमेरिकेला बाहेर काढू शकतील, असा विश्वास जनतेला वाटतोय. जो ' चेंज ' ओबामा आणू पहात आहेत, त्याचं आकर्षण इथल्या तरुणांना आहे आणि म्हणून तो ओबामांच्या पाठीशी आहे.या वेळी पहिल्यांदाच अमेरिकन अध्यक्षपदाच्या प्रचारात धार्मिक किंवा भावनिक मुद्यांपेक्षा नैतिक आणि आर्थिक मुद्दे पुढे आले आहेत का ?निश्चितपणे. सध्या अमेरिकेत जी मंदीची लाट आली आहे, त्यामुळे सर्वसामान्य माणूस धास्तावून गेलाय. नव्या अध्यक्षाला यासंदर्भात भूमिका घेणं आणि लवकरात लवकर त्यावर उपाय शोधणं आवश्यक आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की जगासमोर अमेरिकेची प्रतिमा कितीही लिबरल असली तरी त्या समाजातला जो भेदभाव आहे, शोषण आहे, त्याची जाणीव असणारी एक व्यक्ती ओबामांच्या रुपात आज पुढे येत आहे. मग नैतिकतेच्य दृष्टीने बोलायचं तर, वर्णभेद असेल किंवा आर्थिक दरी असेल, हे सगळे मुद्दे ओबामांच्या प्रचारातून समोर येत आहेत. ओबामांनी या मुद्यांना प्रचारात महत्वाचं स्थान मिळवून दिलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 3, 2008 01:15 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 3, 2008 01:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close