S M L

ए. के. हंगल यांना सरकारतर्फे 50 हजार रुपयांची मदत जाहीर

20 जानेवारीदिग्गज अभिनेते ए. के. हंगल सध्या हलाखीच्या स्थितीत जगत आहेत. अनेक सिनेमांत धीरगंभीर अभिनयानं त्यांनी प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर केलं. श्रीमंत ग्लॅमरस बॉलिवूडचे हे दिग्गज अभिनेते आज प्रकृतीच्या कारणामुळे तसेच आर्थिक कारणामुळे अडचणीत आहेत. या बातमीची दखल घेऊन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांना सरकारतर्फे 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली. "इतना सन्नाटा क्यू है भाई.." शोलेमधला ए. के. हंगल यांचा अजरामर डायलॉग. पण आज हाच सन्नाटा त्यांच्या आयुष्यात आहे. सांताक्रूझला 2 रूम्स किचनमध्ये ते राहत आहे. आज त्यांचं वय आहे 95 वर्षं. किडनी आणि अस्थमाच्या आजारानं ते त्रस्त आहेत. आजही गुड्डी, बावर्ची, नमक हराम यांच्या सिनेमातल्या त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. ए. के. हंगल यांच्या औषधांचा खर्च दर महिन्याला 15 हजार रुपये आहे. त्यांचा मुलगाही आता रिटायर्ड झाला आहे. त्यामुळे हा खर्च भागवणं त्याना कठीण जातं आहे. फिल्म इंडस्ट्रीकडून त्यांना कसलीच मदत मिळत नाही. या दिग्गज अभिनेत्याच्या आयुष्यातला हा सन्नाटा दूर करणं हे फिल्म इंडस्ट्रीचं कर्तव्य आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 20, 2011 06:01 PM IST

ए. के. हंगल यांना सरकारतर्फे 50 हजार रुपयांची मदत जाहीर

20 जानेवारी

दिग्गज अभिनेते ए. के. हंगल सध्या हलाखीच्या स्थितीत जगत आहेत. अनेक सिनेमांत धीरगंभीर अभिनयानं त्यांनी प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर केलं. श्रीमंत ग्लॅमरस बॉलिवूडचे हे दिग्गज अभिनेते आज प्रकृतीच्या कारणामुळे तसेच आर्थिक कारणामुळे अडचणीत आहेत. या बातमीची दखल घेऊन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांना सरकारतर्फे 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली.

"इतना सन्नाटा क्यू है भाई.." शोलेमधला ए. के. हंगल यांचा अजरामर डायलॉग. पण आज हाच सन्नाटा त्यांच्या आयुष्यात आहे. सांताक्रूझला 2 रूम्स किचनमध्ये ते राहत आहे. आज त्यांचं वय आहे 95 वर्षं. किडनी आणि अस्थमाच्या आजारानं ते त्रस्त आहेत. आजही गुड्डी, बावर्ची, नमक हराम यांच्या सिनेमातल्या त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.

ए. के. हंगल यांच्या औषधांचा खर्च दर महिन्याला 15 हजार रुपये आहे. त्यांचा मुलगाही आता रिटायर्ड झाला आहे. त्यामुळे हा खर्च भागवणं त्याना कठीण जातं आहे. फिल्म इंडस्ट्रीकडून त्यांना कसलीच मदत मिळत नाही. या दिग्गज अभिनेत्याच्या आयुष्यातला हा सन्नाटा दूर करणं हे फिल्म इंडस्ट्रीचं कर्तव्य आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 20, 2011 06:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close