S M L

आरुषी हत्याप्रकरणी तलवार यांची कोर्टानं याचिका फेटाळली

21 जानेवारीआरुषी हत्याप्रकरणी गाझियाबाद कोर्टानंही आरुषीचे वडील राजेश तलवार यांना धक्का दिला. सीबीआयने सादर केलेला क्लोजर रिपोर्ट, केस डायरी आणि इतर माहिती मिळण्यासाठीच्या तलवार यांची याचिका कोर्टानं फेटाळली आहेत. राजेश तलवार हे याप्रकरणातले एक संशयित आरोपी असल्याने त्यांना ही माहिती मिळण्याचे अधिकार नाहीत असं म्हणणं सीबीआयनं मांडलं आहे. केससंदर्भातली सर्व माहिती ही केवळ कोर्टाच्या संदर्भासाठी देण्यात आली होती असंही म्हणणं सीबीआयनं मांडलं आहे. तर सीबीआयनं आपल्या क्लोजर रिपोर्टमध्ये कोणालाही दोषी ठरवलं नव्हतं त्यामुळे हे रिपोर्ट पहाण्याचा आम्हाला अधिकार आहे अशी तलवार यांची बाजू आहे. कोर्टानं त्यांचा हा दावा फेटाळला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 21, 2011 09:49 AM IST

आरुषी हत्याप्रकरणी  तलवार यांची कोर्टानं याचिका फेटाळली

21 जानेवारी

आरुषी हत्याप्रकरणी गाझियाबाद कोर्टानंही आरुषीचे वडील राजेश तलवार यांना धक्का दिला. सीबीआयने सादर केलेला क्लोजर रिपोर्ट, केस डायरी आणि इतर माहिती मिळण्यासाठीच्या तलवार यांची याचिका कोर्टानं फेटाळली आहेत. राजेश तलवार हे याप्रकरणातले एक संशयित आरोपी असल्याने त्यांना ही माहिती मिळण्याचे अधिकार नाहीत असं म्हणणं सीबीआयनं मांडलं आहे. केससंदर्भातली सर्व माहिती ही केवळ कोर्टाच्या संदर्भासाठी देण्यात आली होती असंही म्हणणं सीबीआयनं मांडलं आहे. तर सीबीआयनं आपल्या क्लोजर रिपोर्टमध्ये कोणालाही दोषी ठरवलं नव्हतं त्यामुळे हे रिपोर्ट पहाण्याचा आम्हाला अधिकार आहे अशी तलवार यांची बाजू आहे. कोर्टानं त्यांचा हा दावा फेटाळला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 21, 2011 09:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close