S M L

भारतीय नौदलात आयएनएस दीपकचं जलावतरण

21 जानेवारीआज शुक्रवारी भारतीय नौदलात आयएनएस दीपक ही फ्लीट टॅकर बोट सामील करण्यात आली आहे. संरक्षणमंत्री ए.के.अँटोनी आणि नौदलप्रमुख ऍडमिरल निर्मलकुमार वर्मा यांच्या हस्ते या बोटीचं जलावतरण करण्यात आलं. युद्धप्रसंगी युद्धनौकांना रसद पुरवण्याचं काम ही बोट करणार आहे. युद्धाच्यावेळी शत्रुराष्ट्राच्या परिसरात राहणार्‍या युद्धनौकांना, वेळोवेळी लागणारं इंधन, पाणी आणि अन्न पुरवण्याची जबाबदारी मोठी महत्वाची असते. या मिळणार्‍या रसदवरच शत्रूराष्ट्राशी निकाराने लढता येतं. भविष्यातली अश्या प्रकारची गरज ओळखुनच भारतीय नौदलाने इटालीयन बनावटीची आयएनएस दीपक ही बोट बनवुन घेतली. अशा प्रकारची आणखी एक बोट पुढच्या वर्षी भारतीय नौदलात सामील होणार आहे. आयएनएस दीपकमध्ये रसद पुर्ण भरल्यानंतरचं वजन असणार आहे तब्बल सत्तावीस हजार पाचशे टन. तसेच 175 मीटर लांब आणि 25 मीटर रुंदीची ही बोट आहे. त्याचबरोबर तीचा वेग ताशी 20 नॉटीकल मैल म्हणजेच 36 किलोमीटर असणार आहे. त्यामुळे सध्या भारतीय नौदलात सेवे असणार्‍या सर्वात मोठ्या आयएनएस वीराट या विमानवाहु युद्धनौके नंतरची सर्वात मोठी बोट असणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 21, 2011 12:53 PM IST

भारतीय नौदलात आयएनएस दीपकचं जलावतरण

21 जानेवारी

आज शुक्रवारी भारतीय नौदलात आयएनएस दीपक ही फ्लीट टॅकर बोट सामील करण्यात आली आहे. संरक्षणमंत्री ए.के.अँटोनी आणि नौदलप्रमुख ऍडमिरल निर्मलकुमार वर्मा यांच्या हस्ते या बोटीचं जलावतरण करण्यात आलं. युद्धप्रसंगी युद्धनौकांना रसद पुरवण्याचं काम ही बोट करणार आहे. युद्धाच्यावेळी शत्रुराष्ट्राच्या परिसरात राहणार्‍या युद्धनौकांना, वेळोवेळी लागणारं इंधन, पाणी आणि अन्न पुरवण्याची जबाबदारी मोठी महत्वाची असते. या मिळणार्‍या रसदवरच शत्रूराष्ट्राशी निकाराने लढता येतं. भविष्यातली अश्या प्रकारची गरज ओळखुनच भारतीय नौदलाने इटालीयन बनावटीची आयएनएस दीपक ही बोट बनवुन घेतली. अशा प्रकारची आणखी एक बोट पुढच्या वर्षी भारतीय नौदलात सामील होणार आहे. आयएनएस दीपकमध्ये रसद पुर्ण भरल्यानंतरचं वजन असणार आहे तब्बल सत्तावीस हजार पाचशे टन. तसेच 175 मीटर लांब आणि 25 मीटर रुंदीची ही बोट आहे. त्याचबरोबर तीचा वेग ताशी 20 नॉटीकल मैल म्हणजेच 36 किलोमीटर असणार आहे. त्यामुळे सध्या भारतीय नौदलात सेवे असणार्‍या सर्वात मोठ्या आयएनएस वीराट या विमानवाहु युद्धनौके नंतरची सर्वात मोठी बोट असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 21, 2011 12:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close