S M L

कापूस खरेदीसाठी राज्यात फक्त एकच केंद्र

3 नोव्हेंबर , नागपूरप्रशांत कोरटकरविदर्भातल्या शेतक-यांची दरवर्षी भिस्त असते कापसाच्या चांगल्या पिकावर. यंदा पाऊस उशिरा होऊनही कापसाचं पीक ब-यापैकी आलंय. त्यात सरकारनं कापसाला दरही चांगला घोषित केलाय. फेडरेशननं कापूस खरेदीचा मुहूर्त तर केला. पण अजूनपर्यंत राज्यात फक्त एकच केंद्र सुरू झालंय. त्यामुळे शेतकरी अडचणीत आलाय. नागपूर जिल्ह्यातल्या कान्होली बारा इथल्या पंजाबराव इंगळेनी पाच एकर कापसासाठी सावकाराकडून कर्ज घेतलं होतं. दिवाळीनंतर कापूस विकून सावकाराचं कर्ज फेडू असा त्यांचा विचार होता. दिवाळीच्या आधी फेडरेशननं कापूस खरेदीची सुरुवात केली. पण फक्त एकाच केंद्रावर. त्यामुळे त्यांच्या कापसाला उचलच नाही. यंदा महाराष्ट्रात बीटी कॉटनमुळे कापसाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झालीय. राज्यात 35 लाख हेक्टरवर कापसाचा पेरा झाला. त्यातून तीन कोटी पन्नास लाख क्विंटल उत्पन्न येण्याची शक्यता आहे त्यामुळे केंद्रही त्याच प्रमाणात पाहिजे होते. पण नागपूर वगळता राज्यभरात एकही केंद्र सुरू झालं नाही.यंदा सरकारनं कापसाला चांगला भाव जाहीर केलाय. पण त्याला उचल नसल्यानं शेतकरी संकटात सापडलाय.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 3, 2008 02:11 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 3, 2008 02:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close