S M L

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी माफीच्या साक्षीदाराचा घुमजाव

21 जानेवारी2006 मधल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या चौकशीचा गुंता वाढला आहे. एटीएसनं अबरार अहमदला माफीचा साक्षीदार केलं. पण आपला या बॉम्बस्फोटांशी काही संबंध नसल्याचा दावा अबरारनं केला आहे. तसेच या बॉम्बस्फोटांच्या तपासादरम्यान आपण साध्वी प्रज्ञासिंग आणि कर्नल पुरोहितला भेटल्याचा दावा अबरारनं केला. आणि त्याबाबतचं अबरारचं ऍफिडेव्हिट आयबीएन-लोकमतकडे आहे.अबरार म्हणतो " हमें उज्जैन के कुछ मंदीरों मे ले जाकर साधु और साध्वीसे मुलाकात कराई गई. इसके अलावा इसी दौरान हमारी देवलाली मे एक फौजी अफसर से मुलाकात करवाई गई, जहा हमे रखा था वह फौजी अफसर भी उसी इमारत मे रहता था." तसेच आपण जेलमध्येच साध्वी प्रज्ञासिंगला ओळखलं असंही अबरारनं म्हटलं आहे. "जेल मे मुझे मालूम हुवा की मालेगाव में भिकु चौक पर दुसरा ब्लास्ट हुवा था, और एक साध्वी पकडी गई है. इत्तेफाकसे बायकला जेल मेही भिकु चौक ब्लास्ट की मुलजिमा साध्वी प्रज्ञासिंग को रखा गया है. उसे देखते ही मै उसे पहेचान गया यह तो वही साधवी औरत है जिससे मेरी मुलाकात उज्जैन मे करवाई गई थी" मग प्रश्न असा उभा राहतो की अबरार ह्या प्रकरणात पकडला कसा गेला त्याचंच उत्तर देण्याचा प्रयत्न अबरारचे वकील करत आहेत. हे ऍफेडेव्हीट 18 एप्रिल 2009 रोजी केलं गेलं. असिमानंदचा कबुलीजबाब डिसेंबर 2010 मध्ये नोंदवला गेला. त्यामुळे मालेगांव 2006 च्या स्फोटात नक्की कोणाचा हात आहे. हे शोधण्यासाठी या ऍफेडेव्हीटचा उपयोग एनआयए करून घेणार का ? शिवाय अबरारने आपल्या या ऍफेडेव्हीट मध्ये तो देवळाली मध्ये एका फौजी ऑफिसरला आणि इंदौरमध्ये एका काश्मीरी साधुलाही भेटवलं गेलं असं म्हटलं आहे. अबरारला भेटलेले हे दोन इसम नक्की कोण आहेत त्याची माहिती समोर येईल का हा प्रश्नही उपस्थित होतो. मालेगांव 2006 च्या 9 आरोपींवर महाराष्ट्र एटीएसनं चार्जशीट दाखल केलं. पण आता एटीएसच्या तपासाला तडे देणारे नवनवे खुलासे समोर येत आहेत. त्यामुळेच एटीएसने नक्की कुठल्या आधारावर ही चार्जशीट दाखल केलं याचा खुलासा होण्याची गरज आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 21, 2011 02:51 PM IST

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी माफीच्या साक्षीदाराचा घुमजाव

21 जानेवारी

2006 मधल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या चौकशीचा गुंता वाढला आहे. एटीएसनं अबरार अहमदला माफीचा साक्षीदार केलं. पण आपला या बॉम्बस्फोटांशी काही संबंध नसल्याचा दावा अबरारनं केला आहे. तसेच या बॉम्बस्फोटांच्या तपासादरम्यान आपण साध्वी प्रज्ञासिंग आणि कर्नल पुरोहितला भेटल्याचा दावा अबरारनं केला. आणि त्याबाबतचं अबरारचं ऍफिडेव्हिट आयबीएन-लोकमतकडे आहे.

अबरार म्हणतो " हमें उज्जैन के कुछ मंदीरों मे ले जाकर साधु और साध्वीसे मुलाकात कराई गई. इसके अलावा इसी दौरान हमारी देवलाली मे एक फौजी अफसर से मुलाकात करवाई गई, जहा हमे रखा था वह फौजी अफसर भी उसी इमारत मे रहता था." तसेच आपण जेलमध्येच साध्वी प्रज्ञासिंगला ओळखलं असंही अबरारनं म्हटलं आहे. "जेल मे मुझे मालूम हुवा की मालेगाव में भिकु चौक पर दुसरा ब्लास्ट हुवा था, और एक साध्वी पकडी गई है. इत्तेफाकसे बायकला जेल मेही भिकु चौक ब्लास्ट की मुलजिमा साध्वी प्रज्ञासिंग को रखा गया है. उसे देखते ही मै उसे पहेचान गया यह तो वही साधवी औरत है जिससे मेरी मुलाकात उज्जैन मे करवाई गई थी" मग प्रश्न असा उभा राहतो की अबरार ह्या प्रकरणात पकडला कसा गेला त्याचंच उत्तर देण्याचा प्रयत्न अबरारचे वकील करत आहेत.

हे ऍफेडेव्हीट 18 एप्रिल 2009 रोजी केलं गेलं. असिमानंदचा कबुलीजबाब डिसेंबर 2010 मध्ये नोंदवला गेला. त्यामुळे मालेगांव 2006 च्या स्फोटात नक्की कोणाचा हात आहे. हे शोधण्यासाठी या ऍफेडेव्हीटचा उपयोग एनआयए करून घेणार का ? शिवाय अबरारने आपल्या या ऍफेडेव्हीट मध्ये तो देवळाली मध्ये एका फौजी ऑफिसरला आणि इंदौरमध्ये एका काश्मीरी साधुलाही भेटवलं गेलं असं म्हटलं आहे. अबरारला भेटलेले हे दोन इसम नक्की कोण आहेत त्याची माहिती समोर येईल का हा प्रश्नही उपस्थित होतो. मालेगांव 2006 च्या 9 आरोपींवर महाराष्ट्र एटीएसनं चार्जशीट दाखल केलं. पण आता एटीएसच्या तपासाला तडे देणारे नवनवे खुलासे समोर येत आहेत. त्यामुळेच एटीएसने नक्की कुठल्या आधारावर ही चार्जशीट दाखल केलं याचा खुलासा होण्याची गरज आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 21, 2011 02:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close