S M L

विषबाधेमुळे 1 मुलाचा मृत्यू ; 5 गंभीर

21 जानेवारीराज्यात दोन वेगवेगळ्या घटना मध्ये विषबाधा होवून एका मुलाचा मृत्यू झाला आहे तर 100 पेक्षा अधिक जास्त मुलांना विषबाधा झाली आहे. भंडारा जिल्ह्यातील आलेसूर बितूर गावच्या अंगणवाडी केंद्रामध्ये मुलांना खिचडी देण्यात आली. खिचडी दिल्यानंतर आरोग्य विभागाकडून अंगणवाडीच्या मुलांना एलबेंडाझोल ही टॅबलेट देण्यात आली. ही एक्सपायरी टॅबलेट दिल्यामुळे विजय मरज कोल्हे या पाच वर्षाच्या मुलाला जीव गमवावा लागला. अंगणवाडीमध्ये 32 मुलं होती. त्यापैकी 17 मुलांना या औषधाची रिऍक्शन झाली. यात 3 मुलांची प्रकृती चिंताजनक आहे. लहान मुलांना पोटात जंत होऊ नये यासाठी ही टॅबलेट दरवेळी देण्यात येते. ही एक्सपायरी टॅबलेट दिल्यानंतर मुलांना उलट्यांचा त्रास सुरु झाला. या सर्व मुलांना तुमसर इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तर दूसरीकडे नाशिकमध्ये महानगरपालिक ा शाळेतील मुलांना विषबाधा झाली आहे. साधारण 100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना जास्त विषबाधा झाली आहे. 5 मुलं अधिक गंभीर आहेत. म्हसरुळ इथल्या विद्यानिकेतन शाळेत खिचडीतून मुलांना विषबाधा झाली. विद्यार्थ्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. महानगरपालिका आयुक्त आणि अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. दोषींवर कारवाई करू असं आश्वासन त्यांनी दिलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 21, 2011 03:19 PM IST

विषबाधेमुळे 1 मुलाचा मृत्यू ; 5 गंभीर

21 जानेवारी

राज्यात दोन वेगवेगळ्या घटना मध्ये विषबाधा होवून एका मुलाचा मृत्यू झाला आहे तर 100 पेक्षा अधिक जास्त मुलांना विषबाधा झाली आहे. भंडारा जिल्ह्यातील आलेसूर बितूर गावच्या अंगणवाडी केंद्रामध्ये मुलांना खिचडी देण्यात आली. खिचडी दिल्यानंतर आरोग्य विभागाकडून अंगणवाडीच्या मुलांना एलबेंडाझोल ही टॅबलेट देण्यात आली. ही एक्सपायरी टॅबलेट दिल्यामुळे विजय मरज कोल्हे या पाच वर्षाच्या मुलाला जीव गमवावा लागला. अंगणवाडीमध्ये 32 मुलं होती. त्यापैकी 17 मुलांना या औषधाची रिऍक्शन झाली. यात 3 मुलांची प्रकृती चिंताजनक आहे. लहान मुलांना पोटात जंत होऊ नये यासाठी ही टॅबलेट दरवेळी देण्यात येते. ही एक्सपायरी टॅबलेट दिल्यानंतर मुलांना उलट्यांचा त्रास सुरु झाला. या सर्व मुलांना तुमसर इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तर दूसरीकडे नाशिकमध्ये महानगरपालिक ा शाळेतील मुलांना विषबाधा झाली आहे. साधारण 100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना जास्त विषबाधा झाली आहे. 5 मुलं अधिक गंभीर आहेत. म्हसरुळ इथल्या विद्यानिकेतन शाळेत खिचडीतून मुलांना विषबाधा झाली. विद्यार्थ्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. महानगरपालिका आयुक्त आणि अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. दोषींवर कारवाई करू असं आश्वासन त्यांनी दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 21, 2011 03:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close