S M L

कॉमनवेल्थचा एरोस्टॅट बलून कलमाडींना अडचणीत आणणार !

21 जानेवारीवर्ल्ड कप जवळ आला तरी कॉमनवेल्थचं भारूड सुरूच आहे. कॉमनवेल्थ गेम्सचा आणखी एक फुगा फुटला आहे. कॉमनवेल्थच्या उद्घाटन सोहळ्याचं आकर्षण असलेला हेलियमचा बलून आपल्या सगळ्यांच्या लक्षात आहे. पण हा बलूनही वादाच्या कचाट्यातून निसटला नाही. 70 कोटी रुपये खर्चून तयार केलेल्या या बलूनचा पुरेपूर वापरच झाला नाही, असं आयोजन समितीच्या कागदपत्रांतून स्पष्ट होतं. ही कागदपत्रं आयबीएन-नेटवर्कच्या हाती लागली आहेत. या बलूनवर अनेक परफॉर्मन्स सादर होणार होते. पण कोट्यवधी रुपये खर्चूनही बलून वेळेत पूर्ण झाला नाही. त्यामुळे अनेक परफॉर्मन्स रद्द करण्यात आले. याच कारणावरून आयोजन समितीनं अनेक कंपन्यांचे पैसेही रोखून धरले आहेत. कॉमनवेल्थ गेम्सच्या उद्घाटन समारंभात या महाकाय बलूननं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. 70 कोटींचा हा हेलियम बलून या सोहळ्याचं मुख्य आकर्षणही होता. पण आता हाचं बलून अडचणींचा डोंगर ठरतोय.कॉमनवेल्थ गेम्सच्या उद्घाटनाची शान बनला होता, हेलियम बलून, याचं बलूनचा घोळं उजेडात आणणारी ऑलिम्पिक कमिटीची काही महत्वाची कागदपत्रं आयबीएन-नेटवर्कच्या हाती लागली आहेत. कॉमनवेल्थच्या उद्घाटनाच्यावेळी हेलियम बलूनवर अनेक परफॉर्मन्स होणार होते. पण त्यासाठी आवश्यक असलेल्या प्रॅक्टिससाठी वेळचं नव्हता त्यामुळे कलमाडी यांच्या नेतृत्वातल्या समितीनं परफॉर्मन्सेसशिवायचं बलून बसवून घेण्याची घाई केली. बलूनवरचं खास आकर्षण होतं, ते म्हणजे फ्लाईंग परफॉर्मन्स, पण फ्लाईंग परफॉर्मन्सच्या प्रॅक्टिससाठी पुरेसावेळच नव्हता. त्यामुळे परफॉर्मन्स रद्द करावा लागला. पण या घिसाळघाईचा फटका आता बसतोय. कारण या बलूनसोबत परफॉर्मन्स करणाचं काम दिलं होतं ते के.इव्हेंट या कंपनीला आणि आता ऑलिम्पिक कमिटीनं या कंपनीचं कोट्यावधी रुपयांचं पेमेंट रोखून धरलं आहे. सगळे परफॉर्मन्स न झाल्यामुळे हे पेमेन्ट थांबवण्यात आलं आहे. महत्वाचे म्हणजे हेलियम बलूनशी संबंधित व्यवहारावर पहिल्यापासूनच सीबीआयचं लक्ष होत. म्हणूनचं ज्यावेळी सुरेश कलमाडींना चौकशीसाठी बोलावण्यात आलं तेव्हांही त्यांना बलूनच्या खरेदी व्यवहाराबाबत प्रश्न विचारण्यात आले. हा बलून सुरेश कलमाडींच्या अडचणींत आणखी भर घालणार आहे. कारण 70 कोटींच्या या बलूनला आता ग्राहकचं मिळत नाही. न कळतच या बलूनच्या भविष्याशी कलमाडींचं भविष्य जोडल्या गेलं. असंच म्हणावं लागेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 21, 2011 06:09 PM IST

कॉमनवेल्थचा एरोस्टॅट बलून कलमाडींना अडचणीत आणणार !

21 जानेवारी

वर्ल्ड कप जवळ आला तरी कॉमनवेल्थचं भारूड सुरूच आहे. कॉमनवेल्थ गेम्सचा आणखी एक फुगा फुटला आहे. कॉमनवेल्थच्या उद्घाटन सोहळ्याचं आकर्षण असलेला हेलियमचा बलून आपल्या सगळ्यांच्या लक्षात आहे. पण हा बलूनही वादाच्या कचाट्यातून निसटला नाही. 70 कोटी रुपये खर्चून तयार केलेल्या या बलूनचा पुरेपूर वापरच झाला नाही, असं आयोजन समितीच्या कागदपत्रांतून स्पष्ट होतं. ही कागदपत्रं आयबीएन-नेटवर्कच्या हाती लागली आहेत. या बलूनवर अनेक परफॉर्मन्स सादर होणार होते. पण कोट्यवधी रुपये खर्चूनही बलून वेळेत पूर्ण झाला नाही. त्यामुळे अनेक परफॉर्मन्स रद्द करण्यात आले. याच कारणावरून आयोजन समितीनं अनेक कंपन्यांचे पैसेही रोखून धरले आहेत. कॉमनवेल्थ गेम्सच्या उद्घाटन समारंभात या महाकाय बलूननं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. 70 कोटींचा हा हेलियम बलून या सोहळ्याचं मुख्य आकर्षणही होता. पण आता हाचं बलून अडचणींचा डोंगर ठरतोय.

कॉमनवेल्थ गेम्सच्या उद्घाटनाची शान बनला होता, हेलियम बलून, याचं बलूनचा घोळं उजेडात आणणारी ऑलिम्पिक कमिटीची काही महत्वाची कागदपत्रं आयबीएन-नेटवर्कच्या हाती लागली आहेत. कॉमनवेल्थच्या उद्घाटनाच्यावेळी हेलियम बलूनवर अनेक परफॉर्मन्स होणार होते. पण त्यासाठी आवश्यक असलेल्या प्रॅक्टिससाठी वेळचं नव्हता त्यामुळे कलमाडी यांच्या नेतृत्वातल्या समितीनं परफॉर्मन्सेसशिवायचं बलून बसवून घेण्याची घाई केली. बलूनवरचं खास आकर्षण होतं, ते म्हणजे फ्लाईंग परफॉर्मन्स, पण फ्लाईंग परफॉर्मन्सच्या प्रॅक्टिससाठी पुरेसावेळच नव्हता. त्यामुळे परफॉर्मन्स रद्द करावा लागला. पण या घिसाळघाईचा फटका आता बसतोय. कारण या बलूनसोबत परफॉर्मन्स करणाचं काम दिलं होतं ते के.इव्हेंट या कंपनीला आणि आता ऑलिम्पिक कमिटीनं या कंपनीचं कोट्यावधी रुपयांचं पेमेंट रोखून धरलं आहे. सगळे परफॉर्मन्स न झाल्यामुळे हे पेमेन्ट थांबवण्यात आलं आहे. महत्वाचे म्हणजे हेलियम बलूनशी संबंधित व्यवहारावर पहिल्यापासूनच सीबीआयचं लक्ष होत. म्हणूनचं ज्यावेळी सुरेश कलमाडींना चौकशीसाठी बोलावण्यात आलं तेव्हांही त्यांना बलूनच्या खरेदी व्यवहाराबाबत प्रश्न विचारण्यात आले. हा बलून सुरेश कलमाडींच्या अडचणींत आणखी भर घालणार आहे. कारण 70 कोटींच्या या बलूनला आता ग्राहकचं मिळत नाही. न कळतच या बलूनच्या भविष्याशी कलमाडींचं भविष्य जोडल्या गेलं. असंच म्हणावं लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 21, 2011 06:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close