S M L

कलमाडींची अखेर हकालपट्टी

24 जानेवारीकॉमनवेल्थ गेम्स घोटाळ्या प्रकरणी सुरेश कलमाडींना धक्का बसला आहे. कॉमनवेल्थ गेम्सच्या आयोजन समितीच्या अध्यक्षपदावरुन कलमाडींची तत्काळ हकालपट्टी करण्यातआली आहे. सुरेश कलमाडींबरोबरचं त्यांचे सहकारी आणि आयोजन समितीचे महासचिव ललित भानोत यांच्यावरसुद्धा कारवाईची कुर्‍हाड कोसळली. आणि त्यांची सुद्धा हकालपट्टी करण्यात आली. काही दिवसांपूर्वी कलमाडी चौकशी दरम्यान अडथळे आणत असल्याची तक्रार सीबीआयनं केली होती. त्या तक्रारीची दखल घेत ऍटर्नी जनरल यांचा सल्ला घेऊन केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं ही कारवाई केली. त्यामुळे कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी आता चौकशी प्रक्रिया लवकर पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते आहे. आता कलमाडींचा कार्यभार कॉमनवेल्थ गेम्सचे सीईओ जर्नेल सिंग पाहतील.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 24, 2011 11:14 AM IST

कलमाडींची अखेर हकालपट्टी

24 जानेवारी

कॉमनवेल्थ गेम्स घोटाळ्या प्रकरणी सुरेश कलमाडींना धक्का बसला आहे. कॉमनवेल्थ गेम्सच्या आयोजन समितीच्या अध्यक्षपदावरुन कलमाडींची तत्काळ हकालपट्टी करण्यातआली आहे. सुरेश कलमाडींबरोबरचं त्यांचे सहकारी आणि आयोजन समितीचे महासचिव ललित भानोत यांच्यावरसुद्धा कारवाईची कुर्‍हाड कोसळली. आणि त्यांची सुद्धा हकालपट्टी करण्यात आली. काही दिवसांपूर्वी कलमाडी चौकशी दरम्यान अडथळे आणत असल्याची तक्रार सीबीआयनं केली होती. त्या तक्रारीची दखल घेत ऍटर्नी जनरल यांचा सल्ला घेऊन केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं ही कारवाई केली. त्यामुळे कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी आता चौकशी प्रक्रिया लवकर पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते आहे. आता कलमाडींचा कार्यभार कॉमनवेल्थ गेम्सचे सीईओ जर्नेल सिंग पाहतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 24, 2011 11:14 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close