S M L

भाजपची यात्रा थांबवली ; जेटली आणि स्वराज यांना अटक

25 जानेवारीश्रीनगरच्या दिशेने निघालेली भाजपची ही यात्रा आज जम्मूजवळच्या लखनपूर सीमेवर अडवण्यात आली. अत्यंत नाट्यमय परिस्थितीत अरूण जेटली, सुषमा स्वराज आणि भाजपच्या इतर नेत्यांना अटक करण्यात आली. काश्मीरामध्ये ओमर अब्दुल्ला यांचं सरकार फुटीरवाद्यांना शरण गेलं असा आरोप यावेळी भाजपनं केला. भाजपच्या एकता यात्रेवरून संघर्ष पेटला आहे जम्मू आणि काश्मीरच्या पोलिसांनी भाजप नेते सुषमा स्वराज, लालकृष्ण अडवाणी आणि अनुराग ठाकूर यांना अटक केली.24 तासांच्या आत त्यांना दुसर्‍यांदा अटक झाली. पण श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवणारच हा भाजपचा निर्धार मात्र कायम आहे. पण जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मात्र भाजपच्या तिरंगा फडकवण्याला तीव्र विरोध केला. जम्मू आणि काश्मीरमध्ये प्रवेश करण्यासाठी भाजपचे हजारो कार्यकर्ते पंजाबच्या सीमेवर जमले. मधोपूर या पंजाबला जम्मू-काश्मीरपासून वेगळं करणार्‍या गावापासून भाजपच्या 7000 यात्रेकरूंनी लाल चौकच्या दिशेनं मार्च सुरू केला. पण सीमा बंद केली असल्याने आणि जम्मूत कलम 144 लावलं असल्याने पंजाब पोलिसांनी त्यांना पंजाबबाहेर जायला मनाई केली. पण यात्रेकरूंची संख्या वाढतच चालल्याने पोलिसांनी अखेर 500 कार्यकर्त्यांना सोडलं. पण नंतर त्यांना जम्मूत अटक झाली.दरम्यान, ज्या भाजप कार्यकर्त्यांना जम्मूत प्रवेश करणं शक्य झालं नाही त्यांनी धरणं आंदोलन करण्याचा इशारा दिला. भाजपच्या या यात्रेवरून एनडीएतच मतभेद आहेत. पण या यात्रेमुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य येईल, असा विश्वास भाजपला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 25, 2011 04:41 PM IST

भाजपची यात्रा थांबवली ; जेटली आणि स्वराज यांना अटक

25 जानेवारी

श्रीनगरच्या दिशेने निघालेली भाजपची ही यात्रा आज जम्मूजवळच्या लखनपूर सीमेवर अडवण्यात आली. अत्यंत नाट्यमय परिस्थितीत अरूण जेटली, सुषमा स्वराज आणि भाजपच्या इतर नेत्यांना अटक करण्यात आली. काश्मीरामध्ये ओमर अब्दुल्ला यांचं सरकार फुटीरवाद्यांना शरण गेलं असा आरोप यावेळी भाजपनं केला.

भाजपच्या एकता यात्रेवरून संघर्ष पेटला आहे जम्मू आणि काश्मीरच्या पोलिसांनी भाजप नेते सुषमा स्वराज, लालकृष्ण अडवाणी आणि अनुराग ठाकूर यांना अटक केली.24 तासांच्या आत त्यांना दुसर्‍यांदा अटक झाली. पण श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवणारच हा भाजपचा निर्धार मात्र कायम आहे. पण जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मात्र भाजपच्या तिरंगा फडकवण्याला तीव्र विरोध केला.

जम्मू आणि काश्मीरमध्ये प्रवेश करण्यासाठी भाजपचे हजारो कार्यकर्ते पंजाबच्या सीमेवर जमले. मधोपूर या पंजाबला जम्मू-काश्मीरपासून वेगळं करणार्‍या गावापासून भाजपच्या 7000 यात्रेकरूंनी लाल चौकच्या दिशेनं मार्च सुरू केला. पण सीमा बंद केली असल्याने आणि जम्मूत कलम 144 लावलं असल्याने पंजाब पोलिसांनी त्यांना पंजाबबाहेर जायला मनाई केली. पण यात्रेकरूंची संख्या वाढतच चालल्याने पोलिसांनी अखेर 500 कार्यकर्त्यांना सोडलं. पण नंतर त्यांना जम्मूत अटक झाली.दरम्यान, ज्या भाजप कार्यकर्त्यांना जम्मूत प्रवेश करणं शक्य झालं नाही त्यांनी धरणं आंदोलन करण्याचा इशारा दिला. भाजपच्या या यात्रेवरून एनडीएतच मतभेद आहेत. पण या यात्रेमुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य येईल, असा विश्वास भाजपला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 25, 2011 04:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close