S M L

भारतासाठी कोण फायद्याचं बराक ओबामा की जॉन मक्केन

03 नोव्हेंबर,अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक अंतिम टप्प्यात आहे. आणि भारतापुढं आहे लाखमोलाचा सवाल. भारतासाठी कोण फायद्याचं असेल बराक ओबामा की जॉन मक्केन.मागच्या दहा वर्षातला इतिहास पाहिला तर असं दिसतं की रिपब्लिकन असो वा डेमॉक्रॅट्स दोन्ही पक्षांनी भारताशी संबंध चांगले ठेवण्यावर भर दिलाय. 1998 साली भारतानं केलेल्या अणुचाचण्यानंतर क्लिंटन यांनी पहिल्यांदा भारताशी संबंध सुधारण्यासाठी पाऊल उचललं होतं. जॉर्ज बुश यांनी तर यापुढं मजल मारली. संपूर्ण अण्वस्त्रप्रसारबंदी अर्थात एनपीटीवर भारतानं सही केलीच पाहिजे अशी कठोर भूमिका घेणा-या सिनेटमधील आणि न्युक्लिअर सप्लायर ग्रुपमधल्या सदस्यांचा विरोध मोडीत काढत त्यांनी भारतासोबत अणुकरार केला. बहुधा यामुळेच बहुतेक भारतीयांना रिपब्लिकन पक्ष सत्तेत यावा असं वाटतंय. मॅक्केन हे भारत-अमेरिका यांच्यातील स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप तशीच चालू रहावी या मतांचे आहेत. भारताशी लष्करी सहकार्य आणखी वाढवावं, आशियाच्या संरक्षणात भारतानं मोठी जबाबदारी पार पाडावी, असं ते प्रचारात सांगतात. त्यांना भारत राजकीयदृष्टया सर्वात ताकदवान समजल्या जाणा•या जी-8 मध्ये हवा आहे. ओबामांना सुद्धा भारत-अमेरिका स्ट्रटेजिक पार्टनरशिप हवीय. ग्लोबल वॉमीर्ंगच्या बाबतीत त्यांना भारताकडून आणखी सवलती हव्यात. दहशतवादाच्या बाबतीत पाकिस्तानच्या बाबतीत ते कठोर कारवाईची भाषा करतात. इराणबरोबरचे संबंध वाढवण्याकडे त्यांचा कल आहे. अमेरिकेमुळे भारत-इराण संबंधांवर आलेला ताणही कमी होण्यास मदत होणार आहे. मात्र, अन्य डेमॉक्रॅट्स प्रमाणं भविष्यात अण्वस्त्रप्रसारबंदीच्या मुद्द्यावरून ओबामा कठोर भूमिका घेतील अशी भीतीही आहे. याचाच अर्थओबामा निवडून आले तर लाखमोलाचा अणुकराराच्या मोबदल्यात भारताला अणुचाचणी करण्याचं स्वातंत्र्य गमवावं लागणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 3, 2008 05:32 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 3, 2008 05:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close