S M L

जैतापूरमध्ये प्रजासत्ताक दिनावर सामुहिक बहिष्कार !

26 जानेवारीजैतापूर अणुउर्जा प्रकल्पाबाबत सरकारने घेतलेल्या भुमिकेचा निषेध म्हणून या परिसरातल्या प्रकल्पबाधित गावांनी प्रजासत्ताक दिनावर सामुहिक बहिष्कार घातला. माडबन , करेल, मिठगवाणे , अणसुरे साखर गावातल्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये एकही विद्यार्थी ध्वजारोहण सोहळ्याला उपस्थित नव्हते. तसेच ग्रामपंचायतींमध्येही होणारं ध्वजारोहण सरपंचांअभावी ग्रामसेवक आणि कर्मचार्‍यांनाच करावं लागलं. कुणीही ग्रामस्थ शाळा आणि ग्रामपंचायतीमध्ये ध्वजारोहण सोहळ्यासाठी हजर नव्हते. प्रकल्प नको असताना मंत्र्यांकडून आंदोलनाबाबत येणारी वक्तव्ये निषेधार्थ असून यापुढे सरकार आणि प्रशासनाला कायम असहकार्य राहणार असल्याचं प्रकल्पग्रस्तांकडून सांगण्यात येतं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 26, 2011 07:30 AM IST

जैतापूरमध्ये प्रजासत्ताक दिनावर सामुहिक बहिष्कार !

26 जानेवारी

जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाबाबत सरकारने घेतलेल्या भुमिकेचा निषेध म्हणून या परिसरातल्या प्रकल्पबाधित गावांनी प्रजासत्ताक दिनावर सामुहिक बहिष्कार घातला. माडबन , करेल, मिठगवाणे , अणसुरे साखर गावातल्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये एकही विद्यार्थी ध्वजारोहण सोहळ्याला उपस्थित नव्हते. तसेच ग्रामपंचायतींमध्येही होणारं ध्वजारोहण सरपंचांअभावी ग्रामसेवक आणि कर्मचार्‍यांनाच करावं लागलं. कुणीही ग्रामस्थ शाळा आणि ग्रामपंचायतीमध्ये ध्वजारोहण सोहळ्यासाठी हजर नव्हते. प्रकल्प नको असताना मंत्र्यांकडून आंदोलनाबाबत येणारी वक्तव्ये निषेधार्थ असून यापुढे सरकार आणि प्रशासनाला कायम असहकार्य राहणार असल्याचं प्रकल्पग्रस्तांकडून सांगण्यात येतं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 26, 2011 07:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close