S M L

राज्यात सरकारी कर्मचार्‍यांचा कडकडीत बंद

27 जानेवारीयशवंत सोनवणे जळीत हत्याकांडाच्या निषेधार्थ राज्यातल्या सर्व सरकारी अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी आज कामबंद आंदोलन पुकारलं. राज्यभरातले 18 लाख कर्मचारी या आंदोलनात सहभागी झालेत. यामध्ये मंत्रालयातले 7 हजार कर्मचारी सहभागी आहेत.राज्यभरात सगळ्याच ठिकाणी कर्मचार्‍यांनी उत्सफूर्तपणे हा बंद पुकारला आहे. मुंबई, पुणे,जळगाव,सोलापुरात सोनवणेंच्या हत्येचा निषेध करण्यात आला. सोलापुरातल्या महसूल कर्मचार्‍यांनीही मुक मोर्चा काढला. सोलापुरातल्या शहीद चौकातून हा मोर्चा काढण्यात आला. हजारो कर्मचारी या मोर्चात सहभागी झाले होते.नाशिकमध्येही या घटनेचे तीव्र पडसाद उमटलेत.मनमाड बंदची हाक यशवंत सोनवणे जळीत हत्याकांडच्या निषेधार्थ शिवसेनेनं आज मनमाड बंद पुकारलं. नगरपालिका कार्यालय ते तहसिलदार कार्यालयापर्यंत शिवसैनिक मोर्चा काढला. यात नगरपालिकेच्या कर्मचार्‍यांचाही समावेश आहे. पेट्रोल भेसळीचाही निषेध त्यांनी केला. सोनवणे यांच्या हत्येप्रकरणी राज्यभरातून निषेध होत आहे. मंत्रालयात शांतता सरकारी कर्मचार्‍यांनी गजबजलेल्या मंत्रालयामध्ये आज मात्र शांतता होती. सोनवणे यांच्या हत्येच्या निषेधार्थ पुकारलेल्या या बंदमध्ये सरकारी कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत. बांद्रा इथं काळ्या फिती लावून मोर्चा मुंबईतल्या बांद्रा इथं कर्मचार्‍यांनी काळ्या फिती लावून मोर्चा काढला. यशवंत सोनावणे प्रकरणी तातडीनं कारवाई करावी अशी मागणी यावेळी कर्मचार्‍यांनी केली. त्याचबरोबर माझगावमध्ये सेल्स टॅक्स विभागाच्या कर्मचार्‍यांनी मोर्चा काढला यावेळी आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली. पुण्यात सोनवणे यांना श्रद्धांजलीयशवंत सोनवणे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभा आयोजित करण्यात आली होती. कामगिरी बजावताना त्यांची हत्या करण्यात आल्याच्या घटनेचा यावेळी निषेध करण्यात आला. तसेच या सभेनंतर मोर्चा काढण्यात आला. सरकारी कर्मचार्‍यांसोबतच इतर अनेक सामाजिक संघटनांनीही आजच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला. अनेक नागरिकही आजच्या या मोर्चात सहभागी झाले होते. दरम्यान,राजकीय धैर्य असल्यामुळेच माफिया असं कृत्य करायला धजावत आहे अशी प्रतिक्रिया माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी दिली. राजकीय पाठिंब्याची पाळमुळं शोधून काढा अशी मागणीही धर्माधिकारी यांनी केली.जळगावात मुक मोर्चायशवंत सोनवणेंच्या निर्घृण हत्येचा निषेध जळगावमध्येही करण्यात आला. सरकारी कर्मचार्‍यांनी मुक निदर्शनं केली.जळगावमध्ये महसूल विभाग, महानगरपालिका, जिल्ह्याची नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हापरिषदेच्या अप्पर जिल्हाधिकार्‍यांपासून, महापालिका आयुक्तांपर्यंत सगळे मोर्चामध्ये सहभागी झाले होते. त्यांनी एस.पी. ना भेटून एक निवेदनंही दिलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 27, 2011 09:39 AM IST

राज्यात सरकारी कर्मचार्‍यांचा कडकडीत बंद

27 जानेवारी

यशवंत सोनवणे जळीत हत्याकांडाच्या निषेधार्थ राज्यातल्या सर्व सरकारी अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी आज कामबंद आंदोलन पुकारलं. राज्यभरातले 18 लाख कर्मचारी या आंदोलनात सहभागी झालेत. यामध्ये मंत्रालयातले 7 हजार कर्मचारी सहभागी आहेत.राज्यभरात सगळ्याच ठिकाणी कर्मचार्‍यांनी उत्सफूर्तपणे हा बंद पुकारला आहे. मुंबई, पुणे,जळगाव,सोलापुरात सोनवणेंच्या हत्येचा निषेध करण्यात आला. सोलापुरातल्या महसूल कर्मचार्‍यांनीही मुक मोर्चा काढला. सोलापुरातल्या शहीद चौकातून हा मोर्चा काढण्यात आला. हजारो कर्मचारी या मोर्चात सहभागी झाले होते.नाशिकमध्येही या घटनेचे तीव्र पडसाद उमटलेत.

मनमाड बंदची हाक

यशवंत सोनवणे जळीत हत्याकांडच्या निषेधार्थ शिवसेनेनं आज मनमाड बंद पुकारलं. नगरपालिका कार्यालय ते तहसिलदार कार्यालयापर्यंत शिवसैनिक मोर्चा काढला. यात नगरपालिकेच्या कर्मचार्‍यांचाही समावेश आहे. पेट्रोल भेसळीचाही निषेध त्यांनी केला. सोनवणे यांच्या हत्येप्रकरणी राज्यभरातून निषेध होत आहे.

मंत्रालयात शांतता

सरकारी कर्मचार्‍यांनी गजबजलेल्या मंत्रालयामध्ये आज मात्र शांतता होती. सोनवणे यांच्या हत्येच्या निषेधार्थ पुकारलेल्या या बंदमध्ये सरकारी कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत.

बांद्रा इथं काळ्या फिती लावून मोर्चा

मुंबईतल्या बांद्रा इथं कर्मचार्‍यांनी काळ्या फिती लावून मोर्चा काढला. यशवंत सोनावणे प्रकरणी तातडीनं कारवाई करावी अशी मागणी यावेळी कर्मचार्‍यांनी केली. त्याचबरोबर माझगावमध्ये सेल्स टॅक्स विभागाच्या कर्मचार्‍यांनी मोर्चा काढला यावेळी आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली. पुण्यात सोनवणे यांना श्रद्धांजली

यशवंत सोनवणे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभा आयोजित करण्यात आली होती. कामगिरी बजावताना त्यांची हत्या करण्यात आल्याच्या घटनेचा यावेळी निषेध करण्यात आला. तसेच या सभेनंतर मोर्चा काढण्यात आला. सरकारी कर्मचार्‍यांसोबतच इतर अनेक सामाजिक संघटनांनीही आजच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला. अनेक नागरिकही आजच्या या मोर्चात सहभागी झाले होते.

दरम्यान,राजकीय धैर्य असल्यामुळेच माफिया असं कृत्य करायला धजावत आहे अशी प्रतिक्रिया माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी दिली. राजकीय पाठिंब्याची पाळमुळं शोधून काढा अशी मागणीही धर्माधिकारी यांनी केली.

जळगावात मुक मोर्चा

यशवंत सोनवणेंच्या निर्घृण हत्येचा निषेध जळगावमध्येही करण्यात आला. सरकारी कर्मचार्‍यांनी मुक निदर्शनं केली.जळगावमध्ये महसूल विभाग, महानगरपालिका, जिल्ह्याची नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हापरिषदेच्या अप्पर जिल्हाधिकार्‍यांपासून, महापालिका आयुक्तांपर्यंत सगळे मोर्चामध्ये सहभागी झाले होते. त्यांनी एस.पी. ना भेटून एक निवेदनंही दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 27, 2011 09:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close