S M L

बसच्या धडकेनं शाळकरी मुलीचा जागीच मृत्यू ; गावकर्‍यांनी 8 बस पेटवल्या

27 जानेवारीरायगड जिल्ह्यातल्या बेंडसे गावात बसने शाळकरी मुलीला धडक दिल्यानं तिचा जागीच मृत्यू झाला. रिलायन्स कंपनीची ही बस आहे. या घटनेमुळे संतप्त गावकर्‍यांनी नोगोठाणे-पोईनाड रस्ता अडवला. तसेच 4 बस पेटवून दिल्या तर इतर 8 गाड्यांची तोडफोड केली. मयत मुलीचं नाव पुजा कुथे असं आहे. या घटनेनंतर मुलीचे नातेवाईक आणि रिलायन्स कंपनीच्या प्रशासनात चर्चा सुरु आहेत. मागणी पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मुलीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली. घटनास्थळी पोलिसांच्या दोन तुकड्या तैनात आहेत. तर बसचा ड्रायव्हर हरिश्चंद्र मडवीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 27, 2011 10:31 AM IST

बसच्या धडकेनं शाळकरी मुलीचा जागीच मृत्यू ; गावकर्‍यांनी 8 बस पेटवल्या

27 जानेवारी

रायगड जिल्ह्यातल्या बेंडसे गावात बसने शाळकरी मुलीला धडक दिल्यानं तिचा जागीच मृत्यू झाला. रिलायन्स कंपनीची ही बस आहे. या घटनेमुळे संतप्त गावकर्‍यांनी नोगोठाणे-पोईनाड रस्ता अडवला. तसेच 4 बस पेटवून दिल्या तर इतर 8 गाड्यांची तोडफोड केली. मयत मुलीचं नाव पुजा कुथे असं आहे. या घटनेनंतर मुलीचे नातेवाईक आणि रिलायन्स कंपनीच्या प्रशासनात चर्चा सुरु आहेत. मागणी पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मुलीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली. घटनास्थळी पोलिसांच्या दोन तुकड्या तैनात आहेत. तर बसचा ड्रायव्हर हरिश्चंद्र मडवीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 27, 2011 10:31 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close