S M L

ईडन गार्डनवर होणारी मॅच रद्द !

27 जानेवारीयंदाचा क्रिकेट वर्ल्ड कप भारतीय उपखंडात होत आहे. पण आयोजनाला एक जोरदार धक्का बसला. कोलकात्याच्या ईडन गार्डनवर 27 फेब्रुवारीला भारत आणि इंग्लंड दरम्यान होणारी मॅच तिथून हलवण्यात आली आहे. ही मॅच आता बंगळुरुला होईल. आयसीसीच्या पिच कमिटीने याच आठवड्यात ईडन गार्डन मैदानाची पाहणी केली होती. आणि तिथल्या तयारीबद्दल नाराजी व्यक्त केली होती. बंगाल क्रिकेट असोसिएशनने दोन वर्षांपूर्वी स्टेडिअमच्या नुतनीकरणाचं काम हातात घेतलं होतं. आणि ते वेळेवर पूर्ण झालेलं नाही. तर स्टेडिअम 5 फेब्रुवारी पूर्वी तयार होईल असा दावा बंगाल असोसिएशनने केला होता. पण तेच आता 26 तारखेपर्यंत काम चालेल असं सांगत आहेत. त्यामुळे आयसीसीने मॅच हलवण्याचा निर्णय घेतला. ईडन गार्डन हे भारतातलं सगळ्यात मोठं स्टेडिअम आहे. आणि इथं 1987 ची फायनल आणि 96 ची सेमी फायनल मॅच झाली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 27, 2011 02:56 PM IST

ईडन गार्डनवर होणारी मॅच रद्द !

27 जानेवारी

यंदाचा क्रिकेट वर्ल्ड कप भारतीय उपखंडात होत आहे. पण आयोजनाला एक जोरदार धक्का बसला. कोलकात्याच्या ईडन गार्डनवर 27 फेब्रुवारीला भारत आणि इंग्लंड दरम्यान होणारी मॅच तिथून हलवण्यात आली आहे. ही मॅच आता बंगळुरुला होईल. आयसीसीच्या पिच कमिटीने याच आठवड्यात ईडन गार्डन मैदानाची पाहणी केली होती. आणि तिथल्या तयारीबद्दल नाराजी व्यक्त केली होती. बंगाल क्रिकेट असोसिएशनने दोन वर्षांपूर्वी स्टेडिअमच्या नुतनीकरणाचं काम हातात घेतलं होतं. आणि ते वेळेवर पूर्ण झालेलं नाही.

तर स्टेडिअम 5 फेब्रुवारी पूर्वी तयार होईल असा दावा बंगाल असोसिएशनने केला होता. पण तेच आता 26 तारखेपर्यंत काम चालेल असं सांगत आहेत. त्यामुळे आयसीसीने मॅच हलवण्याचा निर्णय घेतला. ईडन गार्डन हे भारतातलं सगळ्यात मोठं स्टेडिअम आहे. आणि इथं 1987 ची फायनल आणि 96 ची सेमी फायनल मॅच झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 27, 2011 02:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close