S M L

सीबीआय चौकशी करावी - विजया सोनवणे

27 जानेवारीनाशिक जिल्ह्यात मनमाडजवळ अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनावणे जळीत हत्याकांड प्रकरणी आता पर्यंत सर्व आरोपींना अटक करण्यात आली. यापैकी तीन आरोपींना 13 दिवसांची पोलिस कोठडी ही देण्यात आली. सोनवणे जळीत हत्याकांड प्रकरणी आज गुरूवारी राज्यभरात सरकारी कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन पुकारलं. आरोपींबद्दल कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होतेय. तर यशवंत सोनवणेंच्या हत्येची सीबीआय चौकशी करा अशी मागणी यशवंत सोनवणेंच्या पत्नी विजया सोनवणे यांनी केली आहे. दरम्यान याप्रकरणातील आरोपींवर मोक्का लावता येईल का याचाही विचार केला जात असल्याचं गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 27, 2011 04:31 PM IST

सीबीआय चौकशी करावी - विजया सोनवणे

27 जानेवारी

नाशिक जिल्ह्यात मनमाडजवळ अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनावणे जळीत हत्याकांड प्रकरणी आता पर्यंत सर्व आरोपींना अटक करण्यात आली. यापैकी तीन आरोपींना 13 दिवसांची पोलिस कोठडी ही देण्यात आली. सोनवणे जळीत हत्याकांड प्रकरणी आज गुरूवारी राज्यभरात सरकारी कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन पुकारलं. आरोपींबद्दल कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होतेय. तर यशवंत सोनवणेंच्या हत्येची सीबीआय चौकशी करा अशी मागणी यशवंत सोनवणेंच्या पत्नी विजया सोनवणे यांनी केली आहे. दरम्यान याप्रकरणातील आरोपींवर मोक्का लावता येईल का याचाही विचार केला जात असल्याचं गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 27, 2011 04:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close