S M L

दिल्लीतल्या राष्ट्रवादी सेनेच्या कार्यालयावर शिवसेनेचा हल्ला

4 नोव्हेंबर, दिल्लीदिल्लीच्या शहादरा परिसरातील राष्ट्रवादी सेनेच्या कार्यालयावर आज शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करून ते पेटवून दिलं. सोमवारी राष्ट्रवादी सेनेनं दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनावर हल्ला केला होता. त्याची प्रतिक्रिया म्हणून हा हल्ला केल्याचं शिवसेनेचे उत्तरभारत संपर्कप्रमुख संदीप कुलकर्णी यांनी सांगितलं. शिवसेनेच्या या हल्ल्यावर राष्ट्रवादी सेनेचे अध्यक्ष जयभगवान गोयल यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ' शिवसेनेला त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ. आमची प्रतिक्रिया तुम्हाला कृतीमधून दिसेल. संजय राऊतांपर्यंत आम्ही आमची प्रतिक्रिया नक्की पोहचवू ' असं त्यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना सांगितलं.दिल्लीत महाराष्ट्र सदनावर झालेल्या हल्ल्यानंतर शिवसेनेने संतप्त प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी या हल्ल्याला आपल्या नेहमीच्या शैलीत उत्तरही दिलंय. एकूणच गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेच्या अजेंड्यावर असलेला मराठी माणसाचा मुद्दा मनसेने हायजॅक केला होता. हे आंदोलन पेटवून पुन्हा एकदा शिवसेनेलाच मराठी माणसाची खरी काळजी असल्याचे दाखवण्याचा शिवसेनेचा हा प्रयत्न मानला जात आहे. पण या सगळ्यामध्ये दिल्लीतल्या मराठी माणसाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्हं निर्माण झालं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 4, 2008 05:18 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 4, 2008 05:18 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close