S M L

चंदन तस्करांचा पोलिसांवर हल्ला

28 जानेवारीसोनवणे यांच्या हत्येला दोन दिवस उलटत नाही तोच नांदेड जिल्हातील पोलिसांवर चंदन तस्करांनी कोयत्यानं हल्ला केल्याची घटना आज घडली आहे. अर्धापूर तालुक्यातील पाटनूर जंगलात ही घटना घडली. या घटनेत दोन पोलीस जखमी झाले आहेत. यामध्ये एकाची प्रकृती गंभीर आहे. या जंगलात चंदन तस्करी होत असल्याची माहिती बारड पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिस जंगलात दाखल झाले. मात्र दबा धरुन बसलेल्या तस्करांनी पोलिसांवर कोयत्यानं वार केला. आणि घटनास्थळावरुन पळ काढला. जखमी पोलिसांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 28, 2011 03:37 PM IST

चंदन तस्करांचा पोलिसांवर हल्ला

28 जानेवारी

सोनवणे यांच्या हत्येला दोन दिवस उलटत नाही तोच नांदेड जिल्हातील पोलिसांवर चंदन तस्करांनी कोयत्यानं हल्ला केल्याची घटना आज घडली आहे. अर्धापूर तालुक्यातील पाटनूर जंगलात ही घटना घडली. या घटनेत दोन पोलीस जखमी झाले आहेत. यामध्ये एकाची प्रकृती गंभीर आहे. या जंगलात चंदन तस्करी होत असल्याची माहिती बारड पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिस जंगलात दाखल झाले. मात्र दबा धरुन बसलेल्या तस्करांनी पोलिसांवर कोयत्यानं वार केला. आणि घटनास्थळावरुन पळ काढला. जखमी पोलिसांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 28, 2011 03:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close