S M L

सोनवणे जळीतकांड प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करा - राहुल गांधी

29 जानेवारीराहुल गांधींच्या महाराष्ट्र दौर्‍याचा आजचा शेवटचा दिवस आहे.आज शनिवारी सकाळी त्यांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेतली. यात राजकारण, आजचा तरुण कार्यकर्ता आणि समाजव्यवस्था यावर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. व्यवस्था चांगलीच आहे पण ती बदलण्यासाठी तरुणांनी प्रयत्न करावेत आणि त्यासाठी राजकारणात यावं असं आवाहन त्यांनी केलं. तसेच भ्रष्टाचार हा गंभीर विषय आहे. त्याकडे तेवढ्याच गांभीर्यांन पाहिलं पाहिजे. चांगली माणस या राजकारणाच्या या व्यवस्थेत येत नाहीत त्यामुळेच मनमाड जळीतकांडासारखी प्रकरण घडतात. अशा प्रकाराना थांबवायचं असेल तर सकारात्मक विचारांच्या तरुणांनी अधिकाधिक राजकारणात यावं. तरच भ्रष्टाचारातून घडणार्‍या अशी भयानक प्रकारांनी आळा बसेल. असं सांगत त्यांनी यशवंत सोनवणेंचं हत्याकांड दुर्देवी आहे, दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 29, 2011 09:39 AM IST

सोनवणे जळीतकांड प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करा - राहुल गांधी

29 जानेवारी

राहुल गांधींच्या महाराष्ट्र दौर्‍याचा आजचा शेवटचा दिवस आहे.आज शनिवारी सकाळी त्यांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेतली. यात राजकारण, आजचा तरुण कार्यकर्ता आणि समाजव्यवस्था यावर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. व्यवस्था चांगलीच आहे पण ती बदलण्यासाठी तरुणांनी प्रयत्न करावेत आणि त्यासाठी राजकारणात यावं असं आवाहन त्यांनी केलं. तसेच भ्रष्टाचार हा गंभीर विषय आहे. त्याकडे तेवढ्याच गांभीर्यांन पाहिलं पाहिजे. चांगली माणस या राजकारणाच्या या व्यवस्थेत येत नाहीत त्यामुळेच मनमाड जळीतकांडासारखी प्रकरण घडतात. अशा प्रकाराना थांबवायचं असेल तर सकारात्मक विचारांच्या तरुणांनी अधिकाधिक राजकारणात यावं. तरच भ्रष्टाचारातून घडणार्‍या अशी भयानक प्रकारांनी आळा बसेल. असं सांगत त्यांनी यशवंत सोनवणेंचं हत्याकांड दुर्देवी आहे, दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 29, 2011 09:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close