S M L

सोनवणे जळीत हत्याकांडाचं राजकारण करू नका- गृहमंत्री

29 जानेवारीयशवंत सोनवणे जळीत हत्याकांड प्रकरणानंतर गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्यावर गोपीनाथ मुंडे यांनी भेसळीतले छोटे मासे पकडून आर. आर. पाटील बनवेगिरी करीत आहे तर गुन्हेगारांच्या हद्दपारी रद्द केल्यानंच अधिकार्‍यांचा मृत्यू झाला आहे अशा अशा शब्दात मुंडे यांनी टीका केली होती. मुंडेच्या टीकेला गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी उत्तर दिलं. गोपिनाथ मुंडे गृहमंत्री असतांना सर्वात जास्त तडीपारी रद्द करण्यात आल्या. अशी टीका आर.आर.पाटील यांनी केली. यशवंत सोनवणे जळीतकांड प्रकरणी गेल्या काही दिवसांपासून गोपिनाथ मुंडे गृहमंत्र्यांवर टीका करत होते. त्याला गृहमंत्र्यांनी आज उत्तर दिलं. तसेच या दुर्देवी घटनेचं राजकारण करु नये असा सल्लाही आर आर पाटील यांनी मुंडेना दिला. मी गेले 3 दिवस आत्मचिंतन करतच आहे असा टोलाही त्यांनी लगावला. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना वाळूचे टेंडर देवू नये अशी विनंती महसूल खात्याला करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 29, 2011 03:13 PM IST

सोनवणे जळीत हत्याकांडाचं राजकारण करू नका- गृहमंत्री

29 जानेवारी

यशवंत सोनवणे जळीत हत्याकांड प्रकरणानंतर गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्यावर गोपीनाथ मुंडे यांनी भेसळीतले छोटे मासे पकडून आर. आर. पाटील बनवेगिरी करीत आहे तर गुन्हेगारांच्या हद्दपारी रद्द केल्यानंच अधिकार्‍यांचा मृत्यू झाला आहे अशा अशा शब्दात मुंडे यांनी टीका केली होती. मुंडेच्या टीकेला गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी उत्तर दिलं. गोपिनाथ मुंडे गृहमंत्री असतांना सर्वात जास्त तडीपारी रद्द करण्यात आल्या. अशी टीका आर.आर.पाटील यांनी केली. यशवंत सोनवणे जळीतकांड प्रकरणी गेल्या काही दिवसांपासून गोपिनाथ मुंडे गृहमंत्र्यांवर टीका करत होते. त्याला गृहमंत्र्यांनी आज उत्तर दिलं. तसेच या दुर्देवी घटनेचं राजकारण करु नये असा सल्लाही आर आर पाटील यांनी मुंडेना दिला. मी गेले 3 दिवस आत्मचिंतन करतच आहे असा टोलाही त्यांनी लगावला. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना वाळूचे टेंडर देवू नये अशी विनंती महसूल खात्याला करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 29, 2011 03:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close