S M L

राहुल गांधींची रायगड भेटीनंतर सातार्‍यात दौर्‍याची सांगता

29 जानेवारीराहुल गांधींच्या महाराष्ट्र दौर्‍याचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज सकाळी त्यांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेतली. राजकारण, आजचा तरुण कार्यकर्ता आणि समाजव्यवस्था यावर त्यांनी भाष्य केलं. भ्रष्टाचार ही कीडच आहे. ती समूळ उपटून टाका असं सांगत त्यांनी यशवंत सोनवणेंचं हत्याकांड दुर्देवी आहे दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर त्यांनी रायगड जिल्ह्यातल्या महाड इथंही भेट दिली. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्पर्शानं पावन झालेल्या चवदार तळ्याला भेट देवून त्यांनी आंबेडकरांच्या स्मृतीला अभिवादन केलं. त्यानंतर श्रेया पिंगळे या लहानग्या मुलीची राहूल गांधीनी आस्थेवाईकपणे विचारपूस केली. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून राहुलनी तडक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक गाठलं. तिथं युवक काँग्रेसच्या सदस्यांशीही त्यांनी संवाद साधला. औरंगाबाद आणि महाडनंतर राहुल गांधी पालघरला रवाना झाले. युवा काँग्रेसच्या होऊ घातलेल्या पक्षांतर्गत निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी हा पालघरचा दौरा केला. यावेळी त्यांनी आदिवासी समाजातून नेता पुढे यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रत्येक ठिकाणी आदिवासींचा सहभाग असावा यासाठी मी पालघरमध्ये आलो असं सुद्धा ते म्हणाले. सातार्‍यात आत्ता शेवटची सभा सुरू आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 29, 2011 03:20 PM IST

राहुल गांधींची रायगड भेटीनंतर सातार्‍यात दौर्‍याची सांगता

29 जानेवारी

राहुल गांधींच्या महाराष्ट्र दौर्‍याचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज सकाळी त्यांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेतली. राजकारण, आजचा तरुण कार्यकर्ता आणि समाजव्यवस्था यावर त्यांनी भाष्य केलं. भ्रष्टाचार ही कीडच आहे. ती समूळ उपटून टाका असं सांगत त्यांनी यशवंत सोनवणेंचं हत्याकांड दुर्देवी आहे दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर त्यांनी रायगड जिल्ह्यातल्या महाड इथंही भेट दिली. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्पर्शानं पावन झालेल्या चवदार तळ्याला भेट देवून त्यांनी आंबेडकरांच्या स्मृतीला अभिवादन केलं. त्यानंतर श्रेया पिंगळे या लहानग्या मुलीची राहूल गांधीनी आस्थेवाईकपणे विचारपूस केली. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून राहुलनी तडक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक गाठलं. तिथं युवक काँग्रेसच्या सदस्यांशीही त्यांनी संवाद साधला. औरंगाबाद आणि महाडनंतर राहुल गांधी पालघरला रवाना झाले. युवा काँग्रेसच्या होऊ घातलेल्या पक्षांतर्गत निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी हा पालघरचा दौरा केला. यावेळी त्यांनी आदिवासी समाजातून नेता पुढे यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रत्येक ठिकाणी आदिवासींचा सहभाग असावा यासाठी मी पालघरमध्ये आलो असं सुद्धा ते म्हणाले. सातार्‍यात आत्ता शेवटची सभा सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 29, 2011 03:20 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close