S M L

सोनवणे जळीत हत्याकांडातील मुख्य आरोपी पोपट शिंदेचा मृत्यू

31 जानेवारी नाशिक जिल्ह्यातील मनमाडजवळ अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे जळीत हत्याकांडातील मुख्य आरोपी पोपट शिंदेचा मृत्यू झाला. 25 जानेवारीला पोपट शिंदे 70 टक्के भाजला होता. आणि सहा दिवसांनी आज दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी त्याचा मृत्यू झाला. भाजलेल्या जखमांमुळे हृदयविकाराचा झटका येऊन शिंदेचा मृत्यू झाला अशी माहिती जेजेचे डीन डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली. जे.जे. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असतांना पोपट शिंदेचा मृत्यू झाला. यशवंत सोनवणे जळीतकांडाच्यावेळी पोपट शिंदे 70 टक्के भाजला होता. त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरु होते. जळीतकांड प्रकरणी त्याचा मृत्यूपूर्व जबाबही पोलिसांना नोंदवता आलेला नाही.25 जानेवारीला यशवंत सोनवणेंसोबत पोपट शिंदेही भाजल्यानं तो पोलिसांच्या हाती लागला होता. त्यावेळी त्याला मालेगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दुसर्‍या दिवशी त्याला नाशिकच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं आणि तिसर्‍या दिवशी मध्यरात्री अडीच वाजता मुंबईच्या जेजे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. तिथेच त्याचा मृत्यू झाला.याकाळात पोलिसांनी त्याची जबानी नोंदवणं महत्त्वाचं होतं. मात्र तो 70 टक्के भाजल्याने जबानी घेता आली नसल्याचे पोलिसांचं म्हणणं आहे. या प्रकरणातला दुसरा आरोपी पोपट शिंदेचा मुलगा कुणाल याच्या जबानीत काही वादग्रस्त नोंद आहे. त्याची शहानिशा पोपट शिंदेच्या जबानीतून होवू शकली असती. मात्र आता पोपटच्या मृत्यूमुळे या प्रकरणातले काही प्रश्न अनुत्तरितच राहिले आहेत.अनुत्तरीत प्रश्नं1. पोपटच्या जप्त टँकरबाबत त्याच्यात आणि मनमाड पोलीस आणि पुरवठा विभागात काय व्यवहार झाला?2. पोपटचा अड्डा कोणत्या राजकीय नेत्याला ताब्यात घ्यायचा होता?3. त्यासाठी मनमाडचा कोणता राजकीय नेता मध्यस्थी करत होता?4. पोपटला कोणाचं संरक्षण होतं?पोपट आरोपी असल्याने त्याचा जबाब नोंदला गेला नाही तरी तपासावर काही परिणाम होणार नाही असं पोलिसांचं म्हणणे आहे. पोपट जिवंत असताना त्याला भेटायला दिलं नसल्याची त्यांच्या बहिणीची तक्रार आहे. पोलिसांचा दावा काहीही असला तरी काही प्रश्नांची उत्तरं सरकारला द्यावी लागणार आहेत. अनुत्तरीत प्रश्नं1. पोपट शिंदेच्या तडीपारीच्या प्रस्तावात त्रुटी ठेवणारा अधिकारी कोण?2. पहिला प्रस्ताव नामंजूर झाल्यावर दुसरा प्रस्ताव का पाठवण्यात आला नाही?3. तेल भेसळीतला सराईत गुन्हेगार असूनही पोपटचा धंदा खुलेआम कोणाच्या संरक्षणावर सुरू होता?कोण होता पोपट शिंदे?- यशवंत सोनवणे यांच्या जळीतकांडातला मुख्य आरोपी- जवळपास 20 वर्षं तेल भेसळीच्या कामात- एकेकाळचा रस्त्यावरचा साखळीचोर - तेल भेसळीतलं कौशल्य शिकून तेलाचे 2 टँकर्स विकत घेतले - त्याची दोन्ही मुलंही तेल भेसळीच्या रॅकेटमध्ये - मनमाड-नांदगाव रस्त्यावर सागर ढाबा विकत घेतला - ढाब्याच्या मागच्या बाजूला तेल भेसळीचा धंदा - जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत अनेक गुन्हे दाखल - अनेक राजकारण्यांशी संबंध

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 31, 2011 08:33 AM IST

सोनवणे जळीत हत्याकांडातील मुख्य आरोपी पोपट शिंदेचा मृत्यू

31 जानेवारी

नाशिक जिल्ह्यातील मनमाडजवळ अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे जळीत हत्याकांडातील मुख्य आरोपी पोपट शिंदेचा मृत्यू झाला. 25 जानेवारीला पोपट शिंदे 70 टक्के भाजला होता. आणि सहा दिवसांनी आज दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी त्याचा मृत्यू झाला. भाजलेल्या जखमांमुळे हृदयविकाराचा झटका येऊन शिंदेचा मृत्यू झाला अशी माहिती जेजेचे डीन डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली. जे.जे. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असतांना पोपट शिंदेचा मृत्यू झाला. यशवंत सोनवणे जळीतकांडाच्यावेळी पोपट शिंदे 70 टक्के भाजला होता. त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरु होते. जळीतकांड प्रकरणी त्याचा मृत्यूपूर्व जबाबही पोलिसांना नोंदवता आलेला नाही.

25 जानेवारीला यशवंत सोनवणेंसोबत पोपट शिंदेही भाजल्यानं तो पोलिसांच्या हाती लागला होता. त्यावेळी त्याला मालेगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दुसर्‍या दिवशी त्याला नाशिकच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं आणि तिसर्‍या दिवशी मध्यरात्री अडीच वाजता मुंबईच्या जेजे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. तिथेच त्याचा मृत्यू झाला.

याकाळात पोलिसांनी त्याची जबानी नोंदवणं महत्त्वाचं होतं. मात्र तो 70 टक्के भाजल्याने जबानी घेता आली नसल्याचे पोलिसांचं म्हणणं आहे. या प्रकरणातला दुसरा आरोपी पोपट शिंदेचा मुलगा कुणाल याच्या जबानीत काही वादग्रस्त नोंद आहे. त्याची शहानिशा पोपट शिंदेच्या जबानीतून होवू शकली असती. मात्र आता पोपटच्या मृत्यूमुळे या प्रकरणातले काही प्रश्न अनुत्तरितच राहिले आहेत.

अनुत्तरीत प्रश्नं

1. पोपटच्या जप्त टँकरबाबत त्याच्यात आणि मनमाड पोलीस आणि पुरवठा विभागात काय व्यवहार झाला?2. पोपटचा अड्डा कोणत्या राजकीय नेत्याला ताब्यात घ्यायचा होता?3. त्यासाठी मनमाडचा कोणता राजकीय नेता मध्यस्थी करत होता?4. पोपटला कोणाचं संरक्षण होतं?

पोपट आरोपी असल्याने त्याचा जबाब नोंदला गेला नाही तरी तपासावर काही परिणाम होणार नाही असं पोलिसांचं म्हणणे आहे. पोपट जिवंत असताना त्याला भेटायला दिलं नसल्याची त्यांच्या बहिणीची तक्रार आहे. पोलिसांचा दावा काहीही असला तरी काही प्रश्नांची उत्तरं सरकारला द्यावी लागणार आहेत.

अनुत्तरीत प्रश्नं

1. पोपट शिंदेच्या तडीपारीच्या प्रस्तावात त्रुटी ठेवणारा अधिकारी कोण?2. पहिला प्रस्ताव नामंजूर झाल्यावर दुसरा प्रस्ताव का पाठवण्यात आला नाही?3. तेल भेसळीतला सराईत गुन्हेगार असूनही पोपटचा धंदा खुलेआम कोणाच्या संरक्षणावर सुरू होता?

कोण होता पोपट शिंदे?

- यशवंत सोनवणे यांच्या जळीतकांडातला मुख्य आरोपी- जवळपास 20 वर्षं तेल भेसळीच्या कामात- एकेकाळचा रस्त्यावरचा साखळीचोर - तेल भेसळीतलं कौशल्य शिकून तेलाचे 2 टँकर्स विकत घेतले - त्याची दोन्ही मुलंही तेल भेसळीच्या रॅकेटमध्ये - मनमाड-नांदगाव रस्त्यावर सागर ढाबा विकत घेतला - ढाब्याच्या मागच्या बाजूला तेल भेसळीचा धंदा - जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत अनेक गुन्हे दाखल - अनेक राजकारण्यांशी संबंध

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 31, 2011 08:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close