S M L

राज ठाकरे यांचा 25 वर्षानंतर लोकलने प्रवास

31 जानेवारी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत मतदारांनी कौल दिला तर दर पंधरा दिवसांनी डोंबिवलीत येण्याचं आश्वासन देणारे राज ठाकरे निवडणूक पार पडल्यानंतर थेट तीन महिन्यांनी डोंबिवलीत पोहचलेत. महापालिकेत मनसेची सत्ता आली नसली तरी पहिल्याच निवडणुकीत मनसेला मतदारांना भरभरुन मतं दिली. त्यामुळे राज ठाकरेंनी आपलं आश्वासन पाळत आज डोंबिवलीला भेट दिली. राज ठाकरे यांनी 25 वर्षानंतर पहिल्यांदा आज लोकलने प्रवास केला. डोंबिवलीत नगरसेवकांची बैठक आटपुन दादरला जायला निघाले असतांना ट्रॅफिक असल्यामुळे त्यांनी ट्रेनने प्रवास केला. डोंबिवलीतून दादर असा राज यांनी प्रवास केला. कॉलेज काळात आपण दोन वर्षे लोकलने प्रवास केल्याच राज ठाकरे यांनी सांगितले. रेल्वेची यंत्रणा अपुरी असल्याच सांगुन लोेंढे थांबवणे हाच एकमेव उपाय असल्याच राज ठाकरे म्हणाले.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 31, 2011 10:34 AM IST

राज ठाकरे यांचा 25 वर्षानंतर लोकलने प्रवास

31 जानेवारी

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत मतदारांनी कौल दिला तर दर पंधरा दिवसांनी डोंबिवलीत येण्याचं आश्वासन देणारे राज ठाकरे निवडणूक पार पडल्यानंतर थेट तीन महिन्यांनी डोंबिवलीत पोहचलेत. महापालिकेत मनसेची सत्ता आली नसली तरी पहिल्याच निवडणुकीत मनसेला मतदारांना भरभरुन मतं दिली. त्यामुळे राज ठाकरेंनी आपलं आश्वासन पाळत आज डोंबिवलीला भेट दिली. राज ठाकरे यांनी 25 वर्षानंतर पहिल्यांदा आज लोकलने प्रवास केला. डोंबिवलीत नगरसेवकांची बैठक आटपुन दादरला जायला निघाले असतांना ट्रॅफिक असल्यामुळे त्यांनी ट्रेनने प्रवास केला. डोंबिवलीतून दादर असा राज यांनी प्रवास केला. कॉलेज काळात आपण दोन वर्षे लोकलने प्रवास केल्याच राज ठाकरे यांनी सांगितले. रेल्वेची यंत्रणा अपुरी असल्याच सांगुन लोेंढे थांबवणे हाच एकमेव उपाय असल्याच राज ठाकरे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 31, 2011 10:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close