S M L

साध्वी प्रज्ञासिंगची नार्को टेस्ट पूर्ण

04 नोव्हेंबर,मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी अटक करण्यात आलेल्या साध्वी प्रज्ञासिंगची नार्को टेस्ट पुर्ण झाली आहे. कलीना इथल्या फॉरेन्सिक लॅबमध्ये ही नार्के टेस्ट सुरू होती. यापूर्वी साध्वीच्या झालेल्या लाय डिटेक्टर आणि ब्रेन मॅपिंग टेस्टमध्ये पोलिसांना काहीच माहिती मिळू शकलेली नव्हती. त्यामुळं नार्को टेस्ट करण्याची परवानगी कोर्टात मागण्यात आली होती. कलीना इथल्या फॉरेन्सिक लॅबमध्ये ही नार्के टेस्ट सुरू होती. यापूर्वी साध्वीच्या झालेल्या लाय डिटेक्टर आणि ब्रेन मॅपिंग टेस्टमध्ये पोलिसांना काहीच माहिती मिळू शकलेली नव्हती. त्यामुळं नार्को टेस्ट करण्याची परवानगी कोर्टात मागण्यात आली होती. मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंग आणि इतर दोघांना नाशिक कोर्टानं 17 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंग आणि इतर दोघांना नाशिकच्या कोर्टात हजर करण्यात आलं.त्यावेळी कोर्टात साध्वीला चक्कर आली. मुंबईत नाशिकच्या कोर्टात नेण्यापूर्वी या सगळ्यांची केईएम हॉस्पीटलमध्ये मेडिकल चाचणी करण्यात आली होती.साध्वीला या प्रकरणात नाहक गोवण्याचा प्रयत्न होतोय, त्याविरोधात लढा देऊ असं तिच्या वकिलांनी सांगितलं. तर भारतीय न्यायसंस्थेवर विश्वास असल्याचं साध्वीची बहीण प्रतिभा झा हीनं म्हटलंय. दरम्यान, मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी आणखी तिघांना अटक करण्यात आलीय. त्यांना 10 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे, अशी माहिती एटीएसचे जॉइट सी. पी. हेमंत करकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी आत्तापर्यंत एटीएसनं आठ लोकांना अटक केलीय. त्यात माजी लष्करी अधिकारीही आहेत. तसंच अभिनव भारत संस्थेच्या ट्रेझररलाही ताब्यात घेण्यात आलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 4, 2008 10:04 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 4, 2008 10:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close