S M L

कॉमनवेल्थ प्रकरणी शुंगलू समितीचा अहवाल सादर

31 जानेवारीकॉमनवेल्थ घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी पंतप्रधानांनी नेमलेल्या शुंगलू समितीने आज आपला पहिला अहवाल सादर केला आहे.हा अहवाल कॉमनवेल्थ खेळांच्या प्रक्षेपण हक्कांविषयी आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या अहवालात प्रसार भारतीचे सीईओ बी.एस लाली यांना 135 कोटी रुपयांच्या नुकसानासाठी जबाबदार धरण्यात आलं आहे. लाली यांनी एस.आय.एस लाईव्ह या खाजगी कंपनीला जास्त किमतीत खेळांच्या प्रक्षेपणाचे हक्क विकल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आला आहे. हीच समिती सध्या सुरेश कलमाडींच्या भूमिकेचाही बारकाईने तपास करत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 31, 2011 05:23 PM IST

कॉमनवेल्थ प्रकरणी शुंगलू समितीचा अहवाल सादर

31 जानेवारी

कॉमनवेल्थ घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी पंतप्रधानांनी नेमलेल्या शुंगलू समितीने आज आपला पहिला अहवाल सादर केला आहे.हा अहवाल कॉमनवेल्थ खेळांच्या प्रक्षेपण हक्कांविषयी आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या अहवालात प्रसार भारतीचे सीईओ बी.एस लाली यांना 135 कोटी रुपयांच्या नुकसानासाठी जबाबदार धरण्यात आलं आहे. लाली यांनी एस.आय.एस लाईव्ह या खाजगी कंपनीला जास्त किमतीत खेळांच्या प्रक्षेपणाचे हक्क विकल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आला आहे. हीच समिती सध्या सुरेश कलमाडींच्या भूमिकेचाही बारकाईने तपास करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 31, 2011 05:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close