S M L

भोईवाडा येथील मैदानासाठी सेनेचा आंदोलनाचा इशारा

31 जानेवारीमुंबई महानगरपालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेलाच भोईवाडा इथल्या मैदानासाठी आंदोलनाचा इशारा द्यावा लागला. सेनेच्या भोईवाडा विभागाने हा इशारा दिला. परळ भोईवाडा भागातल्या ऐतिहासिक सदाकांत ढवण मैदानाची दुरावस्था झाली. मैदानात चारी बाजूंनी जॉगिंग ट्रॅक बनवला गेला तेव्हा मैदानातलं पाणी बाहेर जाण्यासाठी कुठलीच व्यवस्था केली गेली नाही. त्यामुळे, मैदानात खड्डे पडून ते बाद होतं असा शिवसेनेचा आरोप होता. स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर आणि नगरसेवक शकुंतला माने यांच्या स्वत:चा फंड चुकीच्या पद्धतीने वापरण्यामुळे हा प्रकार घडला असा शिवसेनेचे स्थानिक उपविभागप्रमुख विलास राणे यांनी आरोप केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 31, 2011 05:34 PM IST

भोईवाडा येथील मैदानासाठी सेनेचा आंदोलनाचा इशारा

31 जानेवारी

मुंबई महानगरपालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेलाच भोईवाडा इथल्या मैदानासाठी आंदोलनाचा इशारा द्यावा लागला. सेनेच्या भोईवाडा विभागाने हा इशारा दिला. परळ भोईवाडा भागातल्या ऐतिहासिक सदाकांत ढवण मैदानाची दुरावस्था झाली. मैदानात चारी बाजूंनी जॉगिंग ट्रॅक बनवला गेला तेव्हा मैदानातलं पाणी बाहेर जाण्यासाठी कुठलीच व्यवस्था केली गेली नाही. त्यामुळे, मैदानात खड्डे पडून ते बाद होतं असा शिवसेनेचा आरोप होता. स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर आणि नगरसेवक शकुंतला माने यांच्या स्वत:चा फंड चुकीच्या पद्धतीने वापरण्यामुळे हा प्रकार घडला असा शिवसेनेचे स्थानिक उपविभागप्रमुख विलास राणे यांनी आरोप केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 31, 2011 05:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close