S M L

तेल माफियांचा पोलिसांवर हल्ला

01 फेब्रुवारीमनमाडजवळ यशवंत सोनवणे जळीत हत्याकांड ही घटना ताजी असतानाचं नागपुरात तेल माफियांनी पोलीसांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. रॉकेल विक्रेत्यानं पोलिसांवर हा हल्ला केला आहे.उमरेड विभागात ही घटना घडली. राजपूत नावाच्या रॉकेल विक्रेत्याकडे पोलिस चौकशी करण्यासाठी गेले असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. तिथे असलेल्या लोकांनी पोलिसांच्या जीपवर जबर दगडफेक केली. यामध्ये दोन पोलिस अधिकारी आणि दोन पोलिस शिपाई जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उमरेडमध्ये उपचार सुरू आहेत. यामध्ये तेल माफियांची ही टोळी निसटली. या टोळीला जेरबंद करण्यासाठी आता 200 पोलिसांची कुमक या परिसरात पाठवण्यात आली होती. दरम्यान या मारहाणप्रकरणी 19 जणांना अटक करण्यात आली. त्यात 15 महिलांचाही समावेश आहे.तर रायगड जिल्ह्यातही मोठ्याप्रमाणात तेलमाफियांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. खालापूरमध्ये टाकलेल्या धाडीत, 26 हजार लिटर भेसळयुक्त तेल जप्त केलं. तसेच भेसळयुक्त तेलाचा साठा असेलंलं गोदामही सील केलं. खालापूर तहसिलदारांनी ही कारवाई केली.मुंबईत डिझेलचे 3 टँकर जप्तभेसळ माफियांविरुद्धच्या कारवाईत मुंबईत डिझेलचे 3 टँकर पकडण्यात आले आहेत. रेशनिंग विभागाच्या भरारी पथकानं डिझेल चोरी करणार्‍या 7 जणांना काल पोलिसांच्या मदतीनं अटक केली. त्याबरोबरच 3 टँकर्स ताब्यात घेतले आहेत.त्यापैकी 1 टँकर वडाळ्यात तर 2 टँकर्स नवघर पोलीस स्टेशनमध्ये तपासाठी ठेवण्यता आलेत. याप्रकरणी अटक करण्यता आलेल्या आरोपींवर वडाळा आणि नवघर पोलीस स्टेशन्समध्ये गुन्हे दाखल आहेत. 60 लाख रुपयांचा मुद्देमालसुद्धा यावेळी जप्त करण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 1, 2011 09:49 AM IST

तेल माफियांचा पोलिसांवर हल्ला

01 फेब्रुवारी

मनमाडजवळ यशवंत सोनवणे जळीत हत्याकांड ही घटना ताजी असतानाचं नागपुरात तेल माफियांनी पोलीसांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. रॉकेल विक्रेत्यानं पोलिसांवर हा हल्ला केला आहे.उमरेड विभागात ही घटना घडली. राजपूत नावाच्या रॉकेल विक्रेत्याकडे पोलिस चौकशी करण्यासाठी गेले असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. तिथे असलेल्या लोकांनी पोलिसांच्या जीपवर जबर दगडफेक केली. यामध्ये दोन पोलिस अधिकारी आणि दोन पोलिस शिपाई जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उमरेडमध्ये उपचार सुरू आहेत. यामध्ये तेल माफियांची ही टोळी निसटली. या टोळीला जेरबंद करण्यासाठी आता 200 पोलिसांची कुमक या परिसरात पाठवण्यात आली होती. दरम्यान या मारहाणप्रकरणी 19 जणांना अटक करण्यात आली. त्यात 15 महिलांचाही समावेश आहे.

तर रायगड जिल्ह्यातही मोठ्याप्रमाणात तेलमाफियांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. खालापूरमध्ये टाकलेल्या धाडीत, 26 हजार लिटर भेसळयुक्त तेल जप्त केलं. तसेच भेसळयुक्त तेलाचा साठा असेलंलं गोदामही सील केलं. खालापूर तहसिलदारांनी ही कारवाई केली.

मुंबईत डिझेलचे 3 टँकर जप्त

भेसळ माफियांविरुद्धच्या कारवाईत मुंबईत डिझेलचे 3 टँकर पकडण्यात आले आहेत. रेशनिंग विभागाच्या भरारी पथकानं डिझेल चोरी करणार्‍या 7 जणांना काल पोलिसांच्या मदतीनं अटक केली. त्याबरोबरच 3 टँकर्स ताब्यात घेतले आहेत.त्यापैकी 1 टँकर वडाळ्यात तर 2 टँकर्स नवघर पोलीस स्टेशनमध्ये तपासाठी ठेवण्यता आलेत. याप्रकरणी अटक करण्यता आलेल्या आरोपींवर वडाळा आणि नवघर पोलीस स्टेशन्समध्ये गुन्हे दाखल आहेत. 60 लाख रुपयांचा मुद्देमालसुद्धा यावेळी जप्त करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 1, 2011 09:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close