S M L

कांदा व्यापार्‍यांचा लिलावावर बहिष्कार

01 फेब्रुवारीनाशिकमधल्या चांदवड आणि लासलगाव बाजार समित्यांनी 1 क्विंटल कांदा खरेदीत भरली जाणारी दोन किलोची घट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या हिताचा हा निर्णय बर्‍याच वर्षांच्या मागणीनंतर घेण्यात आला. मात्र लासलगावमधल्या व्यापार्‍यांनी याला विरोध केला. त्याच्या निषेधार्थ त्यांनी आजपासून लिलावावर बहिष्कार घातला आहे. घटीचा निकष सगळ्या बाजार समित्यांमध्ये सारखा असावा अशी व्यापार्‍यांची मागणी आहे. त्याचा फटका पुन्हा एकदा शेतकर्‍यांना आणि ग्राहकांना बसणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 1, 2011 09:56 AM IST

कांदा व्यापार्‍यांचा लिलावावर बहिष्कार

01 फेब्रुवारी

नाशिकमधल्या चांदवड आणि लासलगाव बाजार समित्यांनी 1 क्विंटल कांदा खरेदीत भरली जाणारी दोन किलोची घट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या हिताचा हा निर्णय बर्‍याच वर्षांच्या मागणीनंतर घेण्यात आला. मात्र लासलगावमधल्या व्यापार्‍यांनी याला विरोध केला. त्याच्या निषेधार्थ त्यांनी आजपासून लिलावावर बहिष्कार घातला आहे. घटीचा निकष सगळ्या बाजार समित्यांमध्ये सारखा असावा अशी व्यापार्‍यांची मागणी आहे. त्याचा फटका पुन्हा एकदा शेतकर्‍यांना आणि ग्राहकांना बसणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 1, 2011 09:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close