S M L

जैतापूर प्रकल्पग्रस्तांनी विरोधी पक्षाच्या अफवांना बळी पडू नये - राणे

02 फेब्रुवारीउद्योगमंत्री नारायण राणे 4 फ़ेब्रुवारीला जैतापूर अणुउर्जा प्रकल्पग्रस्तांशी चर्चा करणार आहेत. प्रकल्पग्रस्तांनी विरोधी पक्षाच्या अफ़वांना बळी पडू नये अशी विनंती राणे यांनी केली. जैतापूर परिसरातच आपलं घर आणि नातेवाईकांची घर असल्याचे राणे यांनी सांगितलं. हा प्रकल्प धोकादायक असता तर त्याचं समर्थन केलं नसतं असं राणे यांनी स्पष्ट केलं. प्रकल्पग्रस्तांना जाहीर करण्यात आलेल्या पॅकेज आणि पुनर्वसनाची शंभर टक्के अंमलबजावणी होईल असं आश्वासन ही त्यांनी दिलं. राणेंच्या या दौर्‍याला प्रकल्पग्रस्तांचा कसा प्रतिसाद मिळतोय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 2, 2011 11:36 AM IST

जैतापूर प्रकल्पग्रस्तांनी विरोधी पक्षाच्या अफवांना बळी पडू नये - राणे

02 फेब्रुवारी

उद्योगमंत्री नारायण राणे 4 फ़ेब्रुवारीला जैतापूर अणुउर्जा प्रकल्पग्रस्तांशी चर्चा करणार आहेत. प्रकल्पग्रस्तांनी विरोधी पक्षाच्या अफ़वांना बळी पडू नये अशी विनंती राणे यांनी केली. जैतापूर परिसरातच आपलं घर आणि नातेवाईकांची घर असल्याचे राणे यांनी सांगितलं. हा प्रकल्प धोकादायक असता तर त्याचं समर्थन केलं नसतं असं राणे यांनी स्पष्ट केलं. प्रकल्पग्रस्तांना जाहीर करण्यात आलेल्या पॅकेज आणि पुनर्वसनाची शंभर टक्के अंमलबजावणी होईल असं आश्वासन ही त्यांनी दिलं. राणेंच्या या दौर्‍याला प्रकल्पग्रस्तांचा कसा प्रतिसाद मिळतोय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 2, 2011 11:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close