S M L

अखेर इजिप्तचा अध्यक्षांच्या राजीनाम्याची तयारी

02 फेब्रुवारीइजिप्तमधल्या जनतेच्या उठावाला आठ दिवस झाले आहेत आणि आता इजिप्तचे अध्यक्ष होस्नी मुबारक यांनी आपण पदावरून पायउतार व्हायला तयार असल्याचं म्हटलं आहे. मात्र आपली टर्म संपल्यानंतर म्हणजेच सप्टेंबरमधल्या निवडणुकीनंतरच आपण हे पद सोडू असंही त्यांनी स्पष्ट केलं. मुबारक यांनी आपण सप्टेंबरमध्ये होणारी ही निवडणूक लढवणार नसल्याचंही इजिप्तमधल्या सरकारी चॅनेलवर स्पष्ट केले आहे. आपलं पद सोडण्याबद्दल मुबारक यांच्यावर अमेरिकेकडून सतत दबाव येत होता. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी इजिप्तमधली परिस्थिती अशीच राहणं हे योग्य नसल्याचं मुबारक यांना सांगितलं होतं. पण मुबारक यांचे विरोधक मोहम्मद अल बरदेई यांनी मात्र मुबारक यांनी लगेचच पद सोडायला हवं असं म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 2, 2011 11:58 AM IST

अखेर इजिप्तचा अध्यक्षांच्या राजीनाम्याची तयारी

02 फेब्रुवारी

इजिप्तमधल्या जनतेच्या उठावाला आठ दिवस झाले आहेत आणि आता इजिप्तचे अध्यक्ष होस्नी मुबारक यांनी आपण पदावरून पायउतार व्हायला तयार असल्याचं म्हटलं आहे. मात्र आपली टर्म संपल्यानंतर म्हणजेच सप्टेंबरमधल्या निवडणुकीनंतरच आपण हे पद सोडू असंही त्यांनी स्पष्ट केलं. मुबारक यांनी आपण सप्टेंबरमध्ये होणारी ही निवडणूक लढवणार नसल्याचंही इजिप्तमधल्या सरकारी चॅनेलवर स्पष्ट केले आहे. आपलं पद सोडण्याबद्दल मुबारक यांच्यावर अमेरिकेकडून सतत दबाव येत होता. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी इजिप्तमधली परिस्थिती अशीच राहणं हे योग्य नसल्याचं मुबारक यांना सांगितलं होतं. पण मुबारक यांचे विरोधक मोहम्मद अल बरदेई यांनी मात्र मुबारक यांनी लगेचच पद सोडायला हवं असं म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 2, 2011 11:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close