S M L

मुंबईसाठी कोयनेतून पाणी आणण्याचा महापालिकेचा विचार

02 फेब्रुवारीमुंबईची लोकसंख्या लक्षात घेता इथे नेहमीच पाणीटंचाई जाणवते. या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मुंबईपासून साधारण 300 किलोमीटर अंतरावर असलेल्या कोयना धरणातून पाणी आणण्याचा विचार मुंबई महानगरपालिका करत आहे. कोयनेतून मुंबईपर्यंत पाणी आणण्याचा प्रकल्प प्रत्यक्षात आला तर मुंबईची तहान भागवणं काही प्रमाणात तरी शक्य होईल.मुंबईची लोकसंख्या आणि इथल्या सोयीसुविधा यांचं प्रमाण नेहमीच व्यस्त राहिलंय. त्यात मुंबईला मुख्य समस्या भेडसावते ती पाणी टंचाईची. दीड कोटीच्या घरात लोकसंख्या असलेल्या मुंबईला रोज 3 हजार सहाशे मिलियन लिटर पाणी लागतं. (3600 एमलडी).उपलब्ध पाणीसाठ्यातून 2 हजार 900 मिलियन्स लिटरची गरज भागवली जाते.त्यामुळे रोज 700 एमएलडी पाण्याचा तुटवडा जाणवतो. कोयनेच्या वीज निर्मिती केंद्रातून बाहेर पडणारं पाणी वाशिष्टी नदीला जाऊन मिळतं.याच पाण्याचा योग्य वापर केला तर मुंबईला दररोज 500 एमलडी पाणी जास्त मिळू शकेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 2, 2011 03:24 PM IST

मुंबईसाठी कोयनेतून पाणी आणण्याचा महापालिकेचा विचार

02 फेब्रुवारी

मुंबईची लोकसंख्या लक्षात घेता इथे नेहमीच पाणीटंचाई जाणवते. या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मुंबईपासून साधारण 300 किलोमीटर अंतरावर असलेल्या कोयना धरणातून पाणी आणण्याचा विचार मुंबई महानगरपालिका करत आहे. कोयनेतून मुंबईपर्यंत पाणी आणण्याचा प्रकल्प प्रत्यक्षात आला तर मुंबईची तहान भागवणं काही प्रमाणात तरी शक्य होईल.

मुंबईची लोकसंख्या आणि इथल्या सोयीसुविधा यांचं प्रमाण नेहमीच व्यस्त राहिलंय. त्यात मुंबईला मुख्य समस्या भेडसावते ती पाणी टंचाईची. दीड कोटीच्या घरात लोकसंख्या असलेल्या मुंबईला रोज 3 हजार सहाशे मिलियन लिटर पाणी लागतं. (3600 एमलडी).उपलब्ध पाणीसाठ्यातून 2 हजार 900 मिलियन्स लिटरची गरज भागवली जाते.त्यामुळे रोज 700 एमएलडी पाण्याचा तुटवडा जाणवतो. कोयनेच्या वीज निर्मिती केंद्रातून बाहेर पडणारं पाणी वाशिष्टी नदीला जाऊन मिळतं.याच पाण्याचा योग्य वापर केला तर मुंबईला दररोज 500 एमलडी पाणी जास्त मिळू शकेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 2, 2011 03:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close