S M L

पुण्यात रस्त्याच्या उद्घाटनावरुन रंगलं राजकारण !

02 फेब्रुवारीपुण्यामध्ये आज एका रस्त्यावरुन राजकारण रंगलं होतं. भाजप शिवसेनेनी सकाळी आंदोलन करत संगमवाडी ते शहादलबाबा चौक या रस्त्याचे उद्घाटन करण्याचा इशारा दिल्यानंतर महापौरांनी सकाळी साडेसातलाच या रस्त्याचे उद्घाटन करुन टाकले. पण उद्घाटन झालेल्या या रस्त्याची काम मात्र अजूनही अपूर्ण आहेत.संगमवाडीपासून शहादलबाबा दर्ग्यापर्यंतचा रस्ता गेले चार महिने हा रस्ता उद्घाटनाची वाट बघत होता. या रस्त्याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवारांच्याच हस्ते व्हावं अशी सत्ताधार्‍यांची इच्छा होती. उद्घाटनाशिवाय तसाच पडून असलेला रस्ता नागरिकांसाठी खुला करावा असं भाजप- शिवसेनेनं ठरवून टाकलं. पण याची कुणकुण लागल्यावर पुण्याच्या महापौरांनी सकाळी साडेसात वाजताच या रस्त्याचे उद्घाटन करुन टाकलं. मग पाठोपाठ भाजप शिवसेनेनंही इथं विजय सभा घेतली. आणि नारळ फोडून पुन्हा एकदा रस्त्याचं उद्घाटन केलं. एकाच दिवसात दोनदा उद्घाटन होण्याचे भाग्य लाभलेला हा रस्ता वाहतुकीसाठी खरंच तयार आहे का याकडे मात्र यातल्या कोणाचंही लक्ष नव्हतं. श्रेय लाटण्यासाठी सुरू असलेल्या या धडपडीमध्ये कसा का होईना रस्ता मात्र नागरिकांसाठी खुला झाला.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 2, 2011 05:02 PM IST

पुण्यात रस्त्याच्या उद्घाटनावरुन रंगलं राजकारण !

02 फेब्रुवारी

पुण्यामध्ये आज एका रस्त्यावरुन राजकारण रंगलं होतं. भाजप शिवसेनेनी सकाळी आंदोलन करत संगमवाडी ते शहादलबाबा चौक या रस्त्याचे उद्घाटन करण्याचा इशारा दिल्यानंतर महापौरांनी सकाळी साडेसातलाच या रस्त्याचे उद्घाटन करुन टाकले. पण उद्घाटन झालेल्या या रस्त्याची काम मात्र अजूनही अपूर्ण आहेत.

संगमवाडीपासून शहादलबाबा दर्ग्यापर्यंतचा रस्ता गेले चार महिने हा रस्ता उद्घाटनाची वाट बघत होता. या रस्त्याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवारांच्याच हस्ते व्हावं अशी सत्ताधार्‍यांची इच्छा होती. उद्घाटनाशिवाय तसाच पडून असलेला रस्ता नागरिकांसाठी खुला करावा असं भाजप- शिवसेनेनं ठरवून टाकलं. पण याची कुणकुण लागल्यावर पुण्याच्या महापौरांनी सकाळी साडेसात वाजताच या रस्त्याचे उद्घाटन करुन टाकलं. मग पाठोपाठ भाजप शिवसेनेनंही इथं विजय सभा घेतली. आणि नारळ फोडून पुन्हा एकदा रस्त्याचं उद्घाटन केलं. एकाच दिवसात दोनदा उद्घाटन होण्याचे भाग्य लाभलेला हा रस्ता वाहतुकीसाठी खरंच तयार आहे का याकडे मात्र यातल्या कोणाचंही लक्ष नव्हतं. श्रेय लाटण्यासाठी सुरू असलेल्या या धडपडीमध्ये कसा का होईना रस्ता मात्र नागरिकांसाठी खुला झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 2, 2011 05:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close