S M L

वाळूमाफियांना महसूल अधिकार्‍यांच संरक्षण गावकर्‍यांचा आरोप !

03 फेब्रुवारीरत्नागिरीच्या खेड तालुक्यातल्या कोतवली गावाजवळच्या दाभोळ खाडीतून शेकडो ब्रास वाळूचाअनधिकृत उपसा होत आहे. हा प्रकार गावकर्‍यांनीच पोलिसांच्या लक्षात आणून दिला. पण महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी वेळीच पंचनामा केला असला तरीही संबंधितांवर अद्यापही गुन्हे दाखल केले नाही. त्यामुळे खाडीतील वाळू भरलेला बार्ज आणि वाळूचोर पळून गेले आहे. पोलिसांनी फक्त एक वाळू भरलेला ट्रॅक्टर जप्त केला.गेला महिनाभर सुरू असलेला हा प्रकार महसूल अधिकार्‍यांच्या लक्षात आणून देऊनही त्यांच्यावर कारवाई झाली नाही. त्यामुळे वाळूमाफ़ियांना महसूल अधिकार्‍यांच संरक्षण मिळतय असा आरोप गावकर्‍यांनी केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 3, 2011 11:57 AM IST

वाळूमाफियांना महसूल अधिकार्‍यांच संरक्षण गावकर्‍यांचा आरोप !

03 फेब्रुवारी

रत्नागिरीच्या खेड तालुक्यातल्या कोतवली गावाजवळच्या दाभोळ खाडीतून शेकडो ब्रास वाळूचाअनधिकृत उपसा होत आहे. हा प्रकार गावकर्‍यांनीच पोलिसांच्या लक्षात आणून दिला. पण महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी वेळीच पंचनामा केला असला तरीही संबंधितांवर अद्यापही गुन्हे दाखल केले नाही. त्यामुळे खाडीतील वाळू भरलेला बार्ज आणि वाळूचोर पळून गेले आहे. पोलिसांनी फक्त एक वाळू भरलेला ट्रॅक्टर जप्त केला.गेला महिनाभर सुरू असलेला हा प्रकार महसूल अधिकार्‍यांच्या लक्षात आणून देऊनही त्यांच्यावर कारवाई झाली नाही. त्यामुळे वाळूमाफ़ियांना महसूल अधिकार्‍यांच संरक्षण मिळतय असा आरोप गावकर्‍यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 3, 2011 11:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close